बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. काही दिवसांपूर्वीच नेहाने मुलाला जन्म दिलाय. नेहा आणि तिचा पती अंगद बेदीने मुलाच्या जन्माचा आनंद सोशल मीडियावरून व्यक्त करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलीय. तर नुकतेच नेहा ने काही फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. नेहाने पहिल्यांदा आपल्या बाळासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

नेहाने आपल्या बाळासोबतचे आणि डॉक्टरांसोबतचे काही फोट शेअर करत डॉक्टरांचे आभार मानले आहेत. या फोटोंमध्ये नेहाने बाळासोबत गृहप्रवेश करतानाचा फोटोदेखील शेअर केलाय. यात नेहाने तिच्या कुशीत बाळाला नेहाच्या या पोस्टला अनेक सेलिब्रिटींसह अनेक उचलून घेतल्याचं दिसतंय. चाहत्यांनी पसंती दिलीय. नेहाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

ऑनलाईन लैंगिक छळ झाल्याचा स्वरा भास्करचा आरोप, व्हायरल होतोय ‘तो’ सीन

View this post on Instagram

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही पोस्ट शेअर करत नेहाने तिचे डॉक्टर गायत्री राय आणि मंजू सिन्हा यांचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये तिने लिहिलं, ” डॉक्टर मंजू सिन्हा तुमच्या स्पर्शानेच वेदना दूर होतात जे दुसऱ्या कशानेही होत नाही. सर्वात कठीण काळात आणि मी चिंतेत असताना माझ्या खांद्यावरील तुमच्या हलक्या स्पर्धाने आणि तुमच्या स्मित हास्याने मला शांत राहण्यास मदत झाली. तसचं मी मला त्या वेदनांमधून सगळं ठिक होईल म्हणत शातं करण्यचा प्रयत्व केला.” असं म्हणत नेहाने रुग्णालयातील इतर डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे देखील आभार मानले आहेत.

३ ऑक्टोबरला नेहा दुसऱ्यांदा आई झाली आहे. नेहाने रुग्णलयातील तिचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.