नेहा कक्कर सध्या ‘इंडियन आयडल’ या रिअ‍ॅलिटी शोच्या नव्या पर्वामध्ये परिक्षक म्हणून काम करत आहे. काही दिवसांपूर्वी तिने गायलेले ‘ओ सजना’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. हे गाणं फाल्गुनी पाठक यांच्या नव्वदीच्या दशकातल्या ‘मैने पायल है छनकाई’ या हिट गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आहे. या गाण्यामुळे नेहा फार ट्रोल होत आहे. तिच्या या रिमेक गाण्यावर बनवलेले मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

या गाण्याबद्दल खुद्द फाल्गुनी पाठक यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “गाणं प्रदर्शित झाल्यानंतर तीन-चार दिवसांनी मला त्याची माहिती मिळाली. ते ऐकल्यावरची माझी प्रतिक्रिया अजिबात चांगली नव्हती. मला या गाण्यामुळे उलटी आल्यासारखे वाटले होते”, असे त्यांनी म्हटले आहे. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना गाण्याचा रिमेक केल्यानंतर ‘तुम्ही यावर कारवाई करणार आहात का’ असा सवाल विचारण्यात आला. तेव्हा ‘माझ्याकडे गाण्याचे अधिकृत हक्क नसल्याने मी कायदेशीर कारवाई करु शकत नाही’ असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा – Ram Setu Teaser : अक्षय कुमारच्या ‘राम सेतु’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स पाहून चाहतेही भारावले

हे सर्व प्रकरण सुरु असताना या दोघीही एकाच मंचावर एकत्र दिसल्या आहे. नवरात्रोत्सवानिमित्त ‘इंडियन आयडल’ या कार्यक्रमामध्ये फाल्गुनी पाठक यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये परिक्षक असलेल्या नेहाने त्यांचे स्वागत केले आहे. या भागाचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये नेहा, हिमेश रेशमिया आणि सर्व स्पर्धक फाल्गुनी यांच्या गाण्यांवर गरबा करताना दिसत आहेत. बाहेर मतभेद असतानाही कार्यक्रमामध्ये सलोख्याने वागत दोघींनीही त्या व्यावसायिकदृष्ट्या परिपूर्ण असल्याचे दाखवून दिले आहे.

आणखी वाचा – “लोकलमध्ये मी नेलपेंट, लिपस्टिक विकायचे अन्…”, विशाखा सुभेदारने शेअर केल्या खडतर प्रवासातील आठवणी

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी दोघींची स्तुती केली आहे. तर काहीजणांनी त्यांना ट्रोल केले आहे. एकाने या व्हिडीओखाली ‘फाल्गुनीजी तुम्हाला लाज वाटायला हवी. तुम्ही लक्ष वेधून घेण्यासाठी नाटक करत होतात’, अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या यूजरने ‘गाण्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून हे लोक काय करतील याला अंत नाही. आधी दोघी भांडल्या आता टिव्हीवर एकत्र काम करत आहेत’ अशी कमेंट केली आहे.

Story img Loader