प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. आयुष्यातील अनपेक्षित घडामोडींमुळे आपण नैराश्यात असल्याचंही नेहानं कबुलही केलं होतं. ब्रेकअपनंतर झालेली प्रत्येक गोष्ट नेहा सोशल मीडियावर शेअर करत होती. मात्र या गोष्टीचा आता तिला पश्चाताप होत आहे.
एका मुलाखतील तिनं खासगी आयुष्य सार्वजनिक केल्यामुळे खूपच पश्चाताप होत असल्याचं कबुल केलं आहे. ‘नैराश्येत असताना मी ब्रेकबद्दल अनेक गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट केल्या याचं आता मला खूप वाईट वाटत आहे. माझ्यामुळे हिमांशलाही अनेक गोष्टी ऐकाव्या लागत आहे. अनेकांनी हिमांशवर टीका केली. लोकांचा रोष त्याला सहन करावा लागत आहे. हिमांश एक चांगली व्यक्ती आहे. आमचं ब्रेकअप वेगळ्या कारणानं झालं. त्यानं कधीही माझा विश्वासघात केला नाही. मात्र लोक त्याला दोषी धरत आहे. माझं ब्रेकअप हा चर्चेचा विषय ठरलं आहे. आमचं खासगी आयुष्य सार्वजनिक केल्याचा आता मला खूपच पश्चाताप होत आहे.’ असं नेहा मुलाखतीत म्हणाली.
नेहा आणि हिंमाशचं काही महिन्यापूर्वीच ब्रेकअप झालं होतं. नेहा आणि हिमांश लग्न करणार अशा चर्चा सुरू असताना एका अनपेक्षित वळणावर या दोघांचंही नातं संपलं. हिमांशला माझा अमुल्य वेळ मी देत होते, तरीही मी वेळ देत नाही अशी त्याची नेहमीच तक्रार असायची. तो माझ्या योग्यतेचा नव्हताच म्हणून मी नातं तोडलं, असं म्हणत पहिल्यांदाच नेहानं आपल्या ब्रेकअपचं कारण जाहीरपणे सांगितलं होतं. त्यानंतर ब्रेकअपबद्दलच्या अनेक गोष्टी ती सोशल मीडियावर पोस्ट करत होती आता मात्र आपण खासगी गोष्टी सार्वजनिक करताना विचार करू असंही ती म्हणाली.