गायिका फाल्गुनी पाठक यांच्या सुपरहिट गाण्यांचे लाखो चाहते आहेत. आजही तरुणाई फाल्गुनी यांच्या गाण्यावर ठेका धरताना दिसते. त्यांची ‘इंधना विनवा’, ‘सावन मे मोरणी बनके’ सारखी गाणी प्रचंड हिट ठरली. पण त्यांच्या एखाद्या गाण्याचं रिमेक वर्जन तुम्हाला ऐकायला आवडेल का? तर फाल्गुनी यांच्या अनेक चाहत्यांचं यावर बहुदा नाही असंच उत्तर असावं. म्हणूनच की काय गायिका नेहा कक्करने फाल्गुनी यांच्या एका गाण्याचं रिमेक वर्जन गायलं आणि नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा – Video : ऐश्वर्या राय बच्चन दुसऱ्यांदा गरोदर? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

फाल्गुनी यांचं ‘मैने पायल है छनकाई अब तो आजा तू हरजाई’ गाण्याचं रिमेक वर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करने या गाण्याचं रिमेक वर्जन स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्ड केलं आहे. पण फाल्गुनी पाठक यांच्या चाहत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. तसेच नेहाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आपण ट्रोल होत आहे हे पाहता नेहाने आता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – लग्नानंतरही सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर सनी देओलचं सुरु होतं अफेअर, पत्नीला सत्य समजलं अन्…

काय म्हणाली नेहा कक्कर?
“इतक्या लहान वयामध्ये मी आज जे काही कमावलं आहे ते फार कमी लोकांच्या नशिबामध्ये असतं. सुपरहिट गाणी, फेम, सुपरहिट टीव्ही शोज्, वर्ल्ड टूर, लहानांपासून ते ८०-९० वयोगटापर्यंतचे फॅन्स अजून काय पाहिजे… तुम्हाला माहीत आहे का आवड, मेहनत आणि सकारात्मकतेच्या जोरावर मी हे सगळं मिळवलं आहे. आज माझ्याजवळ जे काही आहे त्यासाठी मी देवाचे आभार मानते. मी या जगामधील भाग्यवान व्यक्ती आहे. तुम्हा सर्वांना आनंदा आयुष्यासाठी शुभेच्छा.” असं नेहा कक्करने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.

नेहाने आपल्या पोस्टच्या माध्यमातून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘मैने पायल है छनकाई अब तो आजा तू हरजाई’ गाण्याचं रिमेक वर्जन असणारं ‘ओ सजना’ हे गाणं १९ सप्टेंबरला प्रदर्शित झालं. पण बहुदा फाल्गुनी पाठक यांनादेखील तिचं हे गाणं आवडलं नाही.