आगामी ‘प्रेमासाठी कमिंग सून’मध्ये चित्रपटात अभिनेत्री नेहा पेंडसे ग्लॅमरस लूकमध्ये पाहावयास मिळणार आहे. या लूकसाठी तिने काही जी मेहनत घेतली याविषयी तिच्याशी मारलेल्या गप्पा..
* ‘प्रेमासाठी कमिंग सून’ या चित्रपटासाठी तू १० ते १५ किलो वजन कमी केल आहेस?
– खरं तर मी आधीपासूनच डाएट कॉन्शिअस आहे. त्याचबरोबर मी व्यायामही रेग्यूलर करायचे. मात्र इतक ते दिसून येत नव्हतं. त्यामुळे मी अजूनचं गंभीर झाले. मग मी वजन कमी करण्याचा चंग बांधला. केवळ चित्रपटासाटी नव्हे तर स्वतःच्या उत्तम आरोग्यासाठीही डाएटींग, व्यायाम चांगला असतो. प्रत्येकाला फीट अॅण्ड हेल्दी दिसणं गरजेचं वाटत असतं, मीही तेच केलं.
* तुझ्या वजन कमी करण्याने चित्रपटाला काही मदत झाली का?
– हो खरचं. मुळात ‘प्रेमासाठी कमिंग सून’ हा चित्रपट रोमॅण्टिक जॉनरचा असल्याने यात रोमान्सची दृश्ये आहेत. याआधी मला रोमान्स करण्याची संधी मिळाली नव्हती. या चित्रपटात ती मिळाली. मी आणि आदिनाथ पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. आमच्या जोडीमुळे चित्रपटाला न्याय मिळणार होता. त्यामुळे माझ्या फिट दिसण्याच्या प्रयत्ननाने या चित्रपटाला मदत झाली.
* यासाठी काही डाएट प्लॅन किंवा जिमला तू जात होतीस का?
– हो. मी कर्बोदयुक्त पदार्थ खाण्यास सुरुवात केली. रोज सकाळी उठून वर्कआउट केले. माझ्या ट्रेनरनेही माझ्याकडून भरपूर व्यायाम करुन घेतला. खरं तर माझं शरीर अवजड आहे. इतरांना वर्कआउटचा तीन चार महिन्यात फायदा होतो. पण काही जणांच तसं नसतं. माझ वजन आणि शरीर इतक्या कमी होणारे नव्हते. यापूर्वीही मी व्यायाम करूनही माझ वजन कमी होत नव्हतं. यावेळी फांदी तुटो किंवा पारंबी वजन कमी करण्याचा मी निश्चय केला. सकाळी वर्कआउट मग फळांचा रस, कार्व्हस खात होते त्यामुळे तब्बल सहा महिन्यानंतर माझ्यात परिणाम दिसून आला.
* तुझी झिरो फिगरची व्याख्या काय आहे?
– झिरो फिगरबाबतीत माझी व्याख्या थोडी वेगळी आहे. अगदी हाडकुळ दिसण्याला झिरो फिगर नाही म्हणता येणार. अंगावर थोड तरी मांस असाव, मुळात झिरो फिगर म्हणजे कमनिय आणि आकर्षक बांधा असा होतो.