‘जॉनी गद्दार’ चित्रपटाद्वारे अभिनयाच्या क्षेत्रात पऊल टाकणा-या नील नितीन मुकेशला अशाच प्रकारचे चित्रपट करण्यात रस आहे. चित्रपटात अभिनय करण्याअगोदर सहायक दिग्दर्शकाचे काम करत असलेल्या नील नितीन मुकेशच्या होम प्रॉडक्शनमध्ये बनत असलेल्या ‘पैदार’ या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये सध्या तो व्यस्त आहे.
नील म्हणाला, अभिनयाव्यतिरिक्त मला निर्माता किंवा दिग्दर्शकाच्या भूमिकेतून चित्रपट निर्माण करायला आवडते. चित्रपट बनवताना प्रत्येकाचा स्वत:चा असा एक दृष्टिकोन असतो. मला काही भव्य चित्रपट कारायचे आहेत, जे काल्पनिक पण खूप मनोरंजन करणारे असतील.
नायकाचे अतिशय भव्य स्वरूपाचे सादरीकरण असलेले ‘दबंग’, ‘राउडी राठोड’ किंवा ‘सिंघम’ सारखे चित्रपट तो बनवू इच्छित आहे का, या बाबत विचारले असता तो म्हणाला, भव्य चित्रपटासाठीची प्रत्येकाची परिभाषा वेगळी असू शकते. माझ्यासाठी ‘जॉनी गद्दार’ एक भव्य चित्रपट आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा