दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेलांच्या मुली झिंदझिवा आणि झेनानी यांना ८६व्या अॅकेडमी पुरस्कार सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. ‘मंडेला : लाँग वॉक टू फ्रिडम’ चित्रपटातील ‘ऑर्डिनरी लव्ह’ हे गाणे या पुरस्कार सोहळ्यात सादर करण्यात येणार आहे. ‘डेडलाईन’ने दिलेल्या वृत्तानुसार ऑस्करसाठी नामांकित झालेले सदर गाणे या पारितोषिक वितरण सोहळ्यात ‘यु२’ परफॉर्म करणार आहे. हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी नेल्सन मंडेलांच्या दोन्ही मुलींना आमंत्रित करण्यात आले आहे. आमच्या वडिलांना चित्रपटांची आवड होती, त्यामुळे आमच्यासाठी हे खूप अर्थपूर्ण आहे. माझे वडील रॉब्बेन आयलंड येथील तुरुंगात असताना माझी आई आणि त्यांनी एकमेकांना पाठवलेल्या पत्रांवरून प्रेरीत होऊन या गाण्याची निर्मिती करण्यात आल्याचे या मुलींकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. २ मार्च रोजी हा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
नेल्सन मंडेलांच्या मुलींना ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण
दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेलांच्या मुली झिंदझिवा आणि झेनानी यांना ८६व्या अॅकेडमी पुरस्कार सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
First published on: 24-02-2014 at 08:12 IST
TOPICSनेल्सन मंडेलाNelson MandelaबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nelson mandelas daughters invited for 2014 oscars