बॉलिवूड जगतामध्ये राज्य करणारा अभिनेता शाहरुख खानकडे आजच्या घडीला बंगला, विविध प्रकारच्या गाड्या अशी कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. पण, दिल्लीहून आपले करिअर करण्यासाठी हा अभिनेता मुंबईत आला होता, तेव्हा त्याच्या खिशात निव्वळ ३०० रुपये होते आणि राहायला घरही नव्हते. आज हाच अभिनेता कोट्यवधी किंमत असलेल्या वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगल्यात राहतो. शाहरुखप्रमाणेच त्याचा आलिशान ‘मन्नत’ बंगलाही प्रसिद्ध आहे. त्याचा हा बंगला आतून एखाद्या महालाप्रमाणेच सजावण्यात आला आहे.

वाचा : शाहरुखला पाहण्याची ‘मन्नत’ अनेकांना पडली महागात

Minimum Support Price for Agricultural Produce
शेतमालाला हमीभाव नाहीच ; केंद्राच्या धडपडीनंतरही शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Maharashtra no minimum support price
शेतीमालाला हमीभाव नाहीच, जाणून घ्या, हमीभाव किती, मिळणारा दर किती
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Jitu Patwari said cm Shivraj Singh launched Ladli Behan Yojana but payments in mp irregular
‘लाडक्या बहिणींना रक्कम नियमित मिळणार का? कारण मध्य प्रदेशात…’

१९९५ साली विकत घेतलेल्या बंगल्याला शाहरुखने ‘मन्नत’ हे नाव दिले. त्याकाळी त्याने १५ कोटींना घेतलेल्या या बंगल्याची आताची किंमत तुम्हाला तोंडात बोटं घालण्यास भाग पाडेल. आताच्या घडीला या बंगल्याची किंमत तब्बल २०० कोटी रुपये इतकी आहे. ६००० चौरस फुटांच्या या बंगल्यात बेडरूम, लिविंग एरिया, जीम, खासगी बार, लायब्ररी, मुलांसाठी प्लेरूम आहे. या बंगल्याचे इंटेरियर स्वतः शाहरुखची पत्नी गौरी खान हिने केलंय.

वाचा : ‘माझे ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु न केल्यास मी आत्महत्या करेन’

आपल्या बंगल्याविषयी शाहरुख एका मुलाखतीत म्हणालेला की, यस बॉस चित्रपटाच्या वेळीच ‘मन्नत’ विकत घेण्याची इच्छा माझ्या मनात आली होती. हा बंगला पाहताच क्षणी माझ्या मनात भरला होता. याआधी गुजरातचे पारसी किकू गांधी यांच्या मालकीचा हा बंगला होता. तेव्हा त्याला ‘विला विएना’ नावाने ओळखले जायचे. पण, आज मात्र तो ‘विला विएना’ अनेकांसाठी सेल्फी पाँईंट, कोणासाठी प्रेरणास्थान, कोणासाठी आपल्या आवडत्या कलाकाराला पाहण्याचे ठिकाण झाले आहे.