बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा लाडका तैमूर हा लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. तैमूरचे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून तैमूरला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
तैमूरचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर बॉलिवूडपॅप या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तैमूर बिल्डिंगच्या दरवाज्यातून बाहेर येताना उडी मारताना दिसत आहे. तैमूरचा हा व्हिडीओ शेअर करत ‘तैमूरने काय जबरदस्त एण्ट्री केली आहे’, अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : ५६ वर्षांच्या प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा केले लग्न, फोटो व्हायरल
आणखी वाचा : सलमानला विमानतळावर थांबवणाऱ्या CISF जवानावर कारवाई; मोबाइल जप्त
तैमूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत तैमूरला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘पहिले तर वाटलं की त्याने कचऱ्याच्या डब्यात उडी मारली.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘लिहून घेतो, कधी यूपीएससीच्या परिक्षेत येऊ शकतो हा प्रश्न.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘हे कसं होऊ शकतं, तैमूरने उडी मारली हे शक्यच नाही. यावर माझा विश्वास नाही.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘लॉन्ग जंप किंवा हाय जंपमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक आणेल, शुभेच्छा.’ तर करीनाचा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिला ही ट्रोल केले आहे.