लग्नाच्या १५ वर्षांनंतर बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी दोन वर्षांपूर्वी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर दोघांनी अलीकडेच ‘पानी फाऊंडेशन’च्या कार्यक्रमाला एकत्र हजेरी लावली होती. ‘पानी फाऊंडेशन’च्या संस्थापिका किरण राव यांनी ‘फार्मर कप स्पर्धा २०२२’ च्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात महत्त्वाची निरीक्षणे नोंदवत मराठीमध्ये आपले मत मांडले.
हेही वाचा : दीपिका पदुकोणने इन्स्टाग्रामवरील नावात केला मोठा बदल…जाणून घ्या कारण
किरण राव म्हणाल्या, “फार्मर कपमध्ये आम्ही तुमच्याबरोबर सहभागी होऊ शकलो नाही याची मला खूप खंत आहे, परंतु या सगळ्या प्रवासात सर्व शेतकरी एकत्र आले ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. शेतकऱ्यांनी नव्या गोष्टी शिकण्याची तयारी दाखवली हे सोपे नव्हते विश्वासाचा पाया विज्ञानातून पक्का झाला. निसर्गाची मदत घेतली, तर किती चांगली शेती करता येते याची प्रचिती शेतकऱ्यांना आली तसेच या संपूर्ण उपक्रमात तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. पानी फाऊंडेशनमुळे समाजाची महिला शेतकऱ्यांकडे बघण्याची दृष्टी बदलली” अशी अनेक निरीक्षणे त्यांनी नोंदवली.
https://www.facebook.com/watch?v=643698260941294
किरण राव यांनी संपूर्ण भाषण मराठीत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. त्यांचे मराठी ऐकून नेटकरी सुद्धा भारावले आहेत. अनेकांनी प्रतिक्रिया देताना “किरण मॅडम खूपच छान…”, “तुम्ही छान मराठीत बोलता” अशा कमेंट्स पानी फाऊंडेशनने शेअर केलेल्या व्हिडीओवर केल्या आहेत. तर काहींनी “अमृता फडणवीस ताईंपेक्षा जास्त छान मराठी बोलतात किरण मॅडम…” असेही म्हटले आहे.
हेही वाचा : स्वत:ची समजून अनोळखी व्यक्तीच्या गाडीत बसणार होती शहनाझ गिल, इतक्यात… अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, लग्नाच्या १५ वर्षानंतर किरण आणि आमिरने घटस्फोटाची घोषणा केली होती. आजपासून ते फक्त मित्र आहेत आणि पती-पत्नी म्हणून एकत्र राहणार नाहीत, असे त्या दोघांनी एक व्हिडिओ शेअर करून सांगितले होते. किरण आणि आमिरच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. पण आजही अनेक कार्यक्रमांमध्ये आमिर खान आणि किरण राव एकत्र दिसतात.