मराठी सिनेसृष्टीत अनेक ऐतिहासिक चित्रपट बनत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिजीत देशपांडे दिग्दर्शित आणि झी स्टुडिओची निर्मिती असलेला ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात मराठीतील हरहुन्नरी अभिनेता अशी ओळख असलेला सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. पावनखिंड येथे घडलेला थरार या चित्रपटातून उलगडला जाणार असल्याने या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : अभिजीत खांडकेकर आणि सिद्धार्थ जाधव पहिल्यांदाच दिसणार एकत्र, चित्रपटाचे हटके पोस्टर प्रदर्शित

गेले अनेक दिवस ‘हर हर महादेव’ हा चित्रपट चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या सुबोध भावेचा या चित्रपटातील लूक आउट झाला होता. त्यानंतर या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. याबद्दल नेतकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली आहे. ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या वृत्तानुसार बहुआयामी अभिनेता शरद केळकर या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षकांमध्येही शरद केळकर ही भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु चित्रपटाच्या टीमकडून अद्याप तशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

याआधी शरदने ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्याने साकारलेल्या या भूमिकेचे प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक झाले. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत पाहायला प्रेक्षक आतुर झाले आहेत.

हेही वाचा : सुबोध भावेने केली नव्या चित्रपटाची घोषणा, महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन

हर हर महादेव चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांची मांदियाळी असणार आहे. मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतलेला आहे. विशेष म्हणजे येत्या दिवाळीत पाच भारतीय भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे. येत्या २५ ऑक्टोबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens saying actor sharad kelkar will be playing bajiprabhu deshpande role in har har mahadev film rnv