आपल्या अतरंगी फॅशनमुळे कायम चर्चेत असणारं नाव म्हणजे मॉडेल उर्फी जावेद होय. उर्फीचं नाव घेतलं की तिने कोणती अतरंगी फॅशन केली असेल आणि विचित्र कपडे परिधान केले असतील, हाच विचार येतो. पण आता उर्फीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने सुंदर असा कुर्ता परिधान केला आहे. तिचा हा लूक पाहून नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी तर हा चमत्कार असल्याचं म्हटलंय.

बॉलिवूडमध्ये ९ वर्षे पूर्ण केल्यानंतर क्रिती सेनॉनची मोठी घोषणा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “जास्त काम करण्याची…”

उर्फीने फिकट जांभळ्या (लॅव्हेंडर) रंगाचा कुर्ता घातलेला एक कँडिड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती सुंदर दिसत आहे. उर्फीचा हा एथनिक लूक फोटो पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ‘उर्फी तू ठिक आहेस ना’? ‘हा AI ने तयार केलेला फोटो आहे’, अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.

‘तुमचे असेल फोटो पहायची सवय नाहीये’, ‘आज याच्या पुढे महाराष्ट्राचं राजकारण पण फिकं पडलं’, ‘आज सूर्य कोणत्या दिशेने उगवला’, ‘कुर्ता छान दिसतोय’, ‘चमत्कार झाला’, अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी उर्फीच्या फोटोवर केल्या आहेत.

urfi javed 5

उर्फीच्या फोटोवर कमेंट्स
urfi javed


उर्फीच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
उर्फीच्या फोटोवरील कमेंट्स

दरम्यान, उर्फी कायम तिच्या अतरंगी कपड्यांमुळे वादात सापडते. तिचा व चित्रा वाघ यांचा वाद तर सर्वश्रूत आहे. याशिवाय तिच्याविरोधात अनेकदा तक्रारीही दाखल होत असतात.