दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने आज ऑस्कर पुरस्कार पटकावला. बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत गाण्याला ऑस्कर देण्यात आला. यावेळी ‘नाटू नाटू’बद्दल बोलताना होस्ट जिमी किमेल आरआरआर बॉलिवूड चित्रपट असल्याचं म्हणाला. जानेवारी महिन्यात ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजिनल गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ‘आरआरआर’ बॉलिवूड चित्रपट नसल्याचं म्हटलं होतं, पण आता होस्ट जिमी किमेलने मात्र या चित्रपटाचा बॉलिवूड चित्रपट म्हणून उल्लेख केला आहे.
Oscar Awards 2023: ‘नाटू नाटू’ने जिंकला पुरस्कार; भारताला पहिल्यांदाच गाण्याने मिळवून दिला ऑस्कर
काय म्हणाले होते राजामौली?
“आरआरआर हा बॉलिवूड चित्रपट नाही, भारताच्या दक्षिण भागातील तो तेलुगू चित्रपट आहे जी आमची कर्मभूमी आहे. मी चित्रपटात गाण्यांचा वापर कथा पुढे घेऊन जाण्यासाठी करतो, चित्रपट मध्येच थांबवून गाणं आणि नाच याचा आस्वाद देणं मला पटत नाही. जर चित्रपट संपल्यावर जर लोकांना ३ तास कसे घालवले हे आठवत नसेल तरच तुम्ही स्वतःला एक यशस्वी फिल्ममेकर म्हणवून घेऊ शकता,” असं राजामौली म्हणाले होते.
नेटकरी संतापले
“RRR हा एक टॉलीवूड चित्रपट असताना ते ‘बॉलिवूड फिल्म’ म्हणून का उल्लेख करत आहेत? पाश्चात्य देशांमध्ये दुर्दैवाने प्रतिनिधित्वाचा अभाव आहे. The Academy तुम्हाला लाज वाटायला पाहिजे,” असं ट्वीट एका यूजरने केलं आहे.
हा चित्रपट बॉलिवूडचा नसून दाक्षिणात्य आहे. तो मूळ तेलुगू भाषेतला आहे. त्यामुळे होस्ट जिमीने त्याला बॉलिवूड चित्रपट म्हटल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.