अभिनेत्री काजोल ही नेहमीच तिच्या कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असते. अनेकदा तिच्या वागण्यामुळे तिला ट्रोलही केले जाते. तर आता तिने एक अजब गोष्ट केली आणि त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. काजोलने नुकतीच तिचा मुलगा युगच्या वाढदिवसाची पार्टी ठेवली होती. या पार्टीत काजोल आणि तिच्या वाईट फॅशन सेन्सची सर्वाधिक चर्चा झाली. मात्र रात्री उशिरा पार्टीवरून परत येत असताना काजोलने केलेल्या एका कृतीमुळे तिला प्रचंड ट्रॉल करण्यात येत आहे.

आणखी वाचा : “‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा चांगला ट्रेंड…” ; विवेक अग्निहोत्रींनी साधला निशाणा

काजोल आणि अजय देवगणचा धाकटा मुलगा युग नुकताच १२ वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसाच्या खास निमित्ताने काजोल आपल्या मुलासोबत मुंबईतील एका हाय क्लास रेस्टॉरंटमध्ये पार्टीसाठी पोहोचली होती. यावेळी काजोलने काळ्या फुलांच्या टॉपसह काळ्या रंगाची पँट घातली होती. जेव्हा तेथे उपास्थित असणाऱ्या फोटोग्राफर्सनी काजोलला पार्टीतून परतताना पाहिले तेव्हा तिने गडद गॉगल घातला होता. हा गडद रंगाचा गॉगल लावल्यामुळे काजोल अंधारात गाडीकडे जाताना अनेकवेळा अडखळताना दिसली. तसेच ती पडू नये म्हणून काजोलने मुलगा युगचा हात धरून कार गाठली.

हा तिचा गमतीशीर व्हिडिओ समोर येताच नेटकरी काजोलची, तिच्या वाईट फॅशन सेन्सची खिल्ली उडवत आहेत. त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर कमेंट करताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, “तुम्ही काळा चष्मा काढला असता तर तुम्हाला कोणाचाही आधार घेत चालावे लागले नसते.” तर दुसऱ्याने गमतीने ‘बरोबर, नाहीतर मॅडम पडल्या असत्या’ असं लिहिलं. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले की, “काजोल मॅडमला कोणीतरी रस्ता दाखवत आहे असे दिसत आहे. कारण त्या तशाच चालत आहेत. तर “तुम्ही असे घाबरून का फिरत आहात?” असा प्रश्न एका नेटकऱ्याने कमेंट करत काजोलला विचारला.

हेही वाचा : ओटीटी माध्यमात काजोलचे दमदार पदार्पण, टीझर पाहिलात का?

२०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात काजोल मोठ्या पडद्यावर शेवटची दिसली होती. या चित्रपटात अजय देवगण आणि सैफ अली खान, शरद केळकर यांच्याही भूमिका होत्या. तर २०२१ मध्ये तिचा ‘त्रिभंगा’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. येत्या काही दिवसांत काजोल ‘सलाम वेंकी’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. तसेच डिस्नी प्लस हॉटस्टारच्या आगामी मालिका ‘द गुड वाईफ’मध्येही काजोल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader