‘आदिपुरुष’ चित्रपटाचे पहिले पोस्टर गुरुवारी रामनवमीच्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आले. हे पोस्टर पाहिल्यानंतर चाहत्यांच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. या चित्रपटाचे टीझर लाँच झाल्यानंतर खूप वाद झाला होता, त्यानंतर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. अशातच आता पोस्टरवरूनही काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवीगाळ, नाकातून रक्त अन्…; वहिनीने छळाचा व्हिडीओ शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकीवर केले आरोप, मुंबई पोलीस ट्वीटला उत्तर देत म्हणाले…

रामनवमीच्या मुहूर्तावर ओम राऊत आणि चित्रपटातील कलाकारांनी ‘आदिपुरुष’चे नवीन पोस्टर रिलीज केले. त्यानंतर पुन्हा एकदा वाद होत आहे. ट्विटरवर #Adipurush हॅशटॅग ट्रेंड करत आहे. ज्यात हजारो लोकांनी ट्वीट केले आहेत. यावेळी काही युजर्सनी पोस्टर पाहून आनंद व्यक्त केला, तर अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

सैफ अली खानच्या लूकनंतर आता लोकांनी क्रिती सेनॉनच्या लूकवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. निर्मात्यांनी सीतेच्या पात्राशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. त्याचं कारण म्हणजे पोस्टरमध्ये सीतेच्या भांगात कुंकू नाही. ‘विश्वास बसत नाही की या प्रोजेक्टमध्ये मनोज मुंतशीर देखील आहे, यामध्ये सीतेच्या भांगेत कुंकूही नाही,’ असं एका युजरने म्हटलं आहे.

‘आता काय बदललं आहे? दोन महिन्यांपूर्वी ज्या गोष्टींवर त्यांनी टीका केली होती त्याच गोष्टीची हे लोक स्तुती का करत आहेत? मला कोणत्याही पात्राच्या पोशाखात बदल झालेला दिसत नाही. निदान आता तरी रावानुद्दीन रावणसूर झाला असेल अशी आशा आहे,’ असं एका युजरने म्हटलंय.

‘सीता मातेच्या भांगेत कुंकू नाही, हे कसं विसरू शकता,’ असं ट्वीट एका युजरने केलंय.

‘आदिपुरुष चित्रपटात हनुमान जी दाढी असलेले पण मुस्लिमांप्रमाणे मिशा नसलेले दाखवले आहेत. त्यांना मिशी असलेले श्री राम आणि श्री लक्ष्मण या दोघांसोबत दाखवले आहेत. हे आपल्या शास्त्रातील वर्णनाच्या विरुद्ध आहे. तसेच ते रावणाने सीता मातेचे अपहरण केले होते, तरीही ते त्याची मानवी बाजू दाखवून अपहरण योग्य ठरवणार आहेत. आदिपुरुषला बॉयकॉट करा. बॉलिवूड आमच्या धर्मावर आघात करत आहेत. त्याऐवजी अरुण गोविल यांचे रामायण पाहा,’ असं एका युजरने म्हटलंय.

‘मला वाटते की ओम राऊत हा ड्रग अॅडिक्ट आहे, असंही एकाने म्हटलंय.

आदिपुरुष पोस्टरवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

अशा रितीने नेटकरी चित्रपटाचं पोस्टर पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.