लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर झालेल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा तब्बल २०९ धावांनी पराभव केला. पाचदिवसीय कसोटी सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला चांगल्या धावा करता आल्या नाहीत. दुसऱ्या डावात भारतीय चाहत्यांना विराटकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती परंतु, कोहली ४९ धावांवर बाद झाला. या वेळी ओव्हल मैदानावर अंतिम सामना पाहण्यासाठी विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माही आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “शार्क टॅंक इंडियामध्ये फंडिंग घोटाळा” ट्विटर युजरचा खळबळजनक दावा, म्हणाला, “प्रत्यक्षात एक पैसाही…”

विराट कोहली बाद झाल्यावर अनुष्काही नाराज झाल्याचे दिसले. सध्या अनुष्का नाराज झालेल्या रिअ‍ॅक्शनचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अनुष्का शर्माला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा : ‘शिवरायांचा छावा’ : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर, चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

भारताच्या पराभवासाठी नेटकऱ्यांनी अनुष्काला कारणीभूत ठरवले आहे. एका युजरने ट्वीट करत लिहिले आहे की, “आतापर्यंत अनुष्का जेव्हा कधी स्टेडियममध्ये आली आहे तेव्हा भारतीय संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही,” तर दुसऱ्या एका युजरने “अनुष्का शर्मा भारतीय संघासाठी खरंच पनौती आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. आणखी एका युजरने लिहिले आहे की, “मी विराटचा चाहता आहे, पण मी एवढे दिवस पाहतोय, अनुष्का स्टेडियममध्ये आली की, विराट नीट खेळत नाही, ना टीम इंडिया जिंकते, कृपया तू मॅच बघायला येत जाऊ नकोस.”

विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे काही चाहत्यांनी या ट्रोलर्सला खडेबोल सुनावत “आता तरी तुमची मानसिकता बदला, यात अनुष्काची काय चूक?” असे प्रश्न विचारले आहेत. दरम्यान, अनुष्का शर्मा लेक वामिकाच्या जन्मानंतर बॉलीवूडपासून दूर आहे. लवकरच अभिनेत्री ‘चकदा एक्स्प्रेस’ चित्रपटातून पुनरागमन करणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens trolls anushka sharma for team india loss at wtc final says she became a panouti for cricket sva 00