वरुण धवन आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या आगामी ‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. लवकरच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. पण त्यापूर्वी या चित्रपटाची संपूर्ण टीम जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनचाच एक भाग म्हणून वरुण-कियाराने चक्क मुंबई मेट्रोमधून प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी वडापाव खाल्ला. यामुळेच हे दोघंही आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत.

आणखी वाचा – “काल ‘धर्मवीर’ पाहिला पण…”, अमृता खानविलकरच्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा, प्रसाद ओकबरोबर फोटोही केला शेअर

वरुण-कियाराचा मेट्रो प्रवासादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वरुण-कियारा वडापाव खाताना दिसत आहेत. पण हा व्हिडीओ व्हायरल होताच ट्रोलर्सनी मात्र या दोघांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर काही जणांनी वरुण-कियाराला चांगलंच सुनावलं आहे.

विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन वरुण-कियाराचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहताच एका युजरने म्हटलं की, “मेट्रोमध्ये खाण्यासाठी परवानगी नाही. पण ह्यांना व्हीआयपीप्रमाणे वागवण्यात येत आहे.” तर दुसऱ्या युजर्सने म्हटलं की, “मुंबई मेट्रोमध्ये खाण्यासाठी बंदी नाही का?” या व्हायरल व्हिडीओमुळे वरुण-कियारा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

आणखी वाचा – ‘ब्रम्हास्त्र’ सुपरहिट की फ्लॉप?, चित्रपटाचा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले, “हा चित्रपट तर…”

दिग्दर्शक करण जौहरचा हा चित्रपट सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला. एका पाकिस्तानी गायकाने तर करणने या चित्रपटासाठी माझं गाणं चोरलं असल्याचा आरोप केला होता. पण अखेरीस २४ जूनला चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. अनिल कपूर, नीतू कपूर, मनिष पॉल देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत काम करताना दिसतील.

Story img Loader