गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट देशभर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील डायलॉग आणि डान्स स्टेप्सची सगळीकडे चर्चा आहे. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जेव्हापासून या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन आले आहे, तेव्हापासून अशा व्हिडीओंची संख्याही वाढली आहे. चित्रपटातील ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ या एका गाण्याच्या डान्स स्टेप्सवर सर्वाधिक व्हिडीओ बनवले जात आहेत. आता याची क्रेझ होळीच्या सणावरही दिसून आली आहे.

अभिनेता कुशल कुशल बद्रिकेचा श्रीवाल्ली गाण्यावरचा एक व्हिडीओ कालपासून तुफान व्हायरल होत आहे. त्याने होळीच्या बाजूलाच श्रीवाल्ली गाण्यावर त्याच्या कुटुंब आणि मित्रपरिवारासह ठेका धरलेला दिसून येतो. त्याने या व्हिडीओला “ह्या वर्षीपासून नवा बाल्या डान्स…” अशी कॅप्शन दीली आहे.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

कुशलचा हा व्हिडीओ नेटीझन्सला आवडला आहे. ७० हजाराहून अधिक लोकांनी बघितला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. कमेंट करत कुशलच्या या क्रियेटीव्हीटीच कौतुक केलं आहे.

Story img Loader