अभिनेत्री करीना कपूर खान सध्या आपलं आईपण साजरं करत आहे. गेल्या महिन्यात तिने मुलाला जन्म दिला आहे. ती आणि तिचा पती अभिनेता सैफ अली खान या दोघांनी आपल्या या दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं आहे. या बाळाच्या जन्मानंतर करीनाने खूप गुप्तता पाळली आहे. तिने अजून बाळाचे फोटो जरी दाखवले नसले तरी या बाळंतपणानंतरचे तिच्यात झालेले बदल ती मिरवत आहे.
करीनाने आपल्या नव्या लूकचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकले आहेत आणि या फोटोंनी नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे. करीनाने तिच्या लूकमध्ये काही बदल केले आहेत, जे तिला अगदीच शोभून दिसत आहेत.
View this post on Instagram
करीनाने आपला हेअरकट केला आहे आणि आपल्या केसांचा रंगही बदलला आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हे फोटोज शेअर केले आहेत. तिच्या स्टायलिस्टनेही तिच्या या बदलांचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या फोटोमध्ये करीना आपल्या नव्या हेअरकटसोबतच आपला कॅज्युअल लूक मिरवताना दिसत आहे. या फोटोजमध्ये तिच्या चेहऱ्यावर आलेलं आईपणाचं तेज सूर्यप्रकाशामुळं आणखीनच खुलून दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने यावर एक भन्नाट कॅप्शनही दिलं आहे. या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “चला आता पुन्हा नव्याने बाळाचे कपडे धुवायला मी तयार झाले आहे.”
View this post on Instagram
तिच्या स्टायलिस्टने शेअर केलेल्या व्हिडिओतही ती कमाल दिसत आहेत. आईपणाच्या विश्रांतीनंतरचा तिचा हा कमबॅक तिच्या चाहत्यांनाही फार आवडला आहे. अवघ्या एका तासातच तिच्या फोटोला 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
करीनाने अद्याप आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव जाहीर केलेलं नाही. तिच्या मुलाचे फोटोही सैफ-करीना किंवा त्यांच्या घरातल्या कोणीही समोर आणलेले नाहीत. महिला दिनाच्या दिवशी करीनाने या नव्या पाहुण्याची एक झलक दाखवली होती. त्यामुळे आता चाहत्यांची बाळाला पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.