दूरचित्रवाहिन्यांचे आक्रमण, स्मार्ट भ्रमणध्वनी, संगणक आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियामुळे वाचन किंवा नाटक पाहणाऱ्यांची संख्या कमी होत चालली असल्याचे बोलले जाते. अपवाद सोडला तर मराठी नाटकाला ‘हाऊसफुल्ल’ बुकिंग मिळत नाही. रविवार किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही पूर्वीसारखा प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत नाही. ज्या नाटय़गृहात एका दिवसात तीन तीन प्रयोग व्हायचे तिथे आता जेमतेम एक किंवा दोन प्रयोग होतात, अशी ओरड नाटय़वर्तुळात ऐकायला मिळते. मात्र असे असले तरी मराठी रंगभूमीवर दोन-चार महिन्यांतून नवी नाटके सादर होतच असतात. गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांवरील चार ते पाच नवी नाटके सादर झाली आहेत. एका नवीन नाटकाचा मुहूर्त झाला आहे. मराठी रंगभूमीसाठी हे चित्र आशादायक आहे.
नाटकात काम केल्यानंतर त्या अनुभवावर मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये काम करण्याचा राजमार्ग सहज प्राप्त होतो; पण आता दूरचित्रवाहिन्यांच्या मालिकांमधील लोकप्रिय चेहरे मराठी नाटकात काम करताना दिसत आहेत. या कलाकारांची एक ‘क्रेझ’ प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. मालिकेतील लोकप्रिय चेहरे प्रत्यक्ष रंगमंचावर काम करताना पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. नाटकाच्या प्रयोगानंतर त्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची संधीही प्रेक्षकांना मिळत आहे. त्याचा फायदा काही प्रमाणात नाटकालाही होत आहे.
मालिकांमधील चेहरे नाटकात
दूरचित्रवाहिन्यांवरील लोकप्रिय मालिकांमधील चेहरे गेल्या काही महिन्यांपासून रंगभूमीवर दाखल होत आहेत. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील शशांक केतकर (श्री) आणि तेजश्री प्रधान (जान्हवी) यांची अनुक्रमे ‘गोष्ट तशी गमतीची’ आणि ‘कार्टी काळजात घुसली’ ही नाटके रंगभूमीवर सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी ‘का रे दुरावा’ या मालिकेतील सुयश टिळक (जय) व सुरुची आडारकर (आदिती) यांचे ‘स्ट्रॉबेरी’ हे नाटकही रंगभूमीवर दाखल झाले आहे. या यादीत आता प्राजक्ता माळी हिची भर पडली आहे. प्राजक्ता माळी आणि सौरभ गोखले यांचे ‘प्लेझंट सरप्राइज’ हे नवे नाटक रंगभूमीवर दाखल झाले आहे. दिवंगत सुधीर भट यांच्या पश्चात ‘सुयोग’ नाटय़संस्थेचे हे नवीन नाटक दीर्घ कालावधीनंतर रंगमंचावर आले आहे. सुधीर भट यांचे सुपुत्र संदेश यांनी आता ‘सुयोग’ची धुरा सांभाळली आहे. आजच्या तरुणाईला आवडेल अशी ‘प्रेमकथा’ त्यांनी नाटकातून सादर केली आहे.
भद्रकाली नाटय़संस्थेचे ‘गेला उडत’ हे नवे नाटकही नुकतेच रंगभूमीवर सादर झाले आहे. नाटय़संस्थेचे हे ५३ वे नाटक आहे. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून अभिनेता सिद्धार्थ जाधव या नाटकात प्रमुख भूमिकेत आहे. सिद्धार्थ जाधव या नाटकात ‘सुपरमॅन’ची भूमिका करतोय. ‘एका सर्वसामान्य माणसाची सुपर गोष्ट’ अशी नाटकाची कॅचलाइन आहे. केदार शिंदे आणि सिद्धार्थ जाधव ही जोडीसुद्धा एका कालावधीनंतर पुन्हा एकदा या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आली आहे.
मालिकांमधून चमकणारा आणखी एक चेहरा म्हणजे अभिनेता चिन्मय उद्गीरकर. त्याचेही ‘कुछ मिठा हो जाए’ हे नाटक रंगभूमीवर नुकतेच आले आहे. नाटकाचे दिग्दर्शन गणेश पंडित यांचे आहे. या नाटकाचे आणखी एक खास वैशिष्टय़ म्हणजे हे नाटक पाच जणांनी मिळून लिहिले आहे. मराठीत कदाचित हा पहिलाच प्रयोग असावा. अंबर हडप, गणेश पंडित, अभिजित गुरू, शिरीष लाटकर, आशीष पाथरे यांनी मिळून या नाटकाचे लेखन केले आहे.
मराठी संगीत रंगभूमीवर ज्या नाटकाने इतिहास घडविला आणि आज शंभर वर्षांनंतरही ज्या नाटकाची आणि त्यातील नाटय़पदांची जादू अद्यापही ओसरलेली नाही ते ‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर सादर झाले आहे. ‘प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन’ निर्मित या नाटकात प्रशांत दामले आणि गायक राहुल देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटामुळे नाटय़ आणि शास्त्रीय संगीताविषयी तरुण पिढीत रुची निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकालाही प्रेक्षकांचा विशेषत: तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. हे नाटक चांगले चालले आणि प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला तर कदाचित अन्य काही जुनी संगीत नाटके नव्या कलाकारांच्या संचात पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. लष्कराच्या पाश्र्वभूमीवरील ‘कोडमंत्र’
अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केल्यानंतरचे पुढील नवे नाटक ‘कोडमंत्र’ हे असणार आहे. दिनेश पेडणेकर, भरत नारायणदास ठक्कर आणि मुक्ता बर्वे यांनी नाटकाची निर्मिती केली असून नाटकात स्वत: मुक्ता बर्वे, अजय पुरकर, उमेश जगताप, स्वाती बोवलेकर, अतुल महाजन, मिलिंद अधिकारी, अमित जांभेकर, फैज खान हे कलाकार आहेत. नाटकाचा मुहूर्त नुकताच पार पडला. ‘कोडमंत्र’ हे मूळ गुजराती नाटक आहे. स्नेहा देसाई नाटकाच्या मूळ लेखिका असून मराठी अनुवाद विजय निकम यांनी केला आहे.
लष्कराच्या पाश्र्वभूमीवर हे नाटक आधारित असून सीमेवर घडणाऱ्या घटना आणि त्याचे परिणाम यात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुक्ता बर्वे यांनी या नाटकाचे गुजराती प्रयोग पाहिला होता. हे नाटक मराठीत आणण्याचा विचार तेव्हाच त्यांच्या मनात आला होता. ‘कोडमंत्र’चे दिग्दर्शन राजेश जोशी यांचे आहे. नाटकात काम करणारे २० ‘कॅडेट्स’ हे या नाटकाचे खास वैशिष्टय़ आहे. येत्या जून महिन्यात हे नाटक रंगभूमीवर सादर होणार आहे.
मालिकांमधील लोकप्रिय चेहरे आणि तरुणाईचा सळसळता उत्साह घेऊन ही नवी नाटके मराठी रंगभूमीवर सादर झाली आहेत. त्याचा फायदा मराठी रंगभूमीच्या ‘तिकिटबारी’वर होतो का, याकडे नाटय़सृष्टीचे लक्ष लागले आहे.