आपल्या खमक्या स्वभावाने नवऱ्याला वठणीवर आणणारी राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते आता किरकोळ नवरे शोधतेय. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे घराघरात पोहचलेली अनिता दाते आता नव्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. ११ ऑगस्टला अनिता दाते, सागर देशमुख आणि पुष्कराज चिरपुटकर या तिघांच्या प्रमुख भूमिका असलेलं हे नाटक रंगभूमीवर येतं आहे. किरकोळ नवरे हे नावच सांगून जातंय की नाटक विनोदी असणार आहे. आता या नाटकात हे तीन कलाकार काय धमाल करणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हसून हसून दमछाक करणारं डामचिक नाटक अशी टॅगलाईन या नाटकाला देण्यात आली आहे. अभिनेत्री अनिता दातेसह सागर देशमुख आणि पुष्करराज चिरपुटकर दिसणार आहेत. अनामिका, युवांजनी नाटक मंडळी निर्मित, साईसाक्षी प्रकाशित या नाटकाचे लेखन – दिग्दर्शन सागर देशमुख याचे आहे.

marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…

आजवर वेगवेगळया भूमिकांमधून या तिघांनी आपली कमाल दाखवली आहे. आता एकत्र येत हे तिघे काय धमाल करतात यासाठी हे नाटक पहायला हवं. मनोरंजनातून अंजन घालणारे हे नाटक करताना आम्ही खूप मजा करतोय. प्रेक्षकही हे नाटक तितकचं एन्जॉय करतील असा विश्वास या तिघांनी व्यक्त केला.

किरकोळ नवरे हे विनोदी नाटक नवरा बायकोच्या नात्याबद्दलचं आहेच, पण नात्यातली असुरक्षितता आणि चिरंतन प्रेमाबद्दलही बोलणारं आहे. या नाटकाचे निर्माते अभिजीत देशपांडे, राहुल कर्णिक, दिनू पेडणेकर आहेत. दिग्दर्शन सहाय्य कल्पेश समेळ तर नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. संगीत सौरभ भालेराव यांचे असून गीते जितेंद्र जोशी यांनी लिहिली आहेत. प्रकाशयोजना विक्रांत ठकार तर वेशभूषा सोनल खराडे यांची आहे.

शुक्रवारी ११ ऑगस्ट दु. ४.१५ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे आणि शनिवार १२ ऑगस्ट दु. ४:३० वाजता सावित्रीबाई फुले, डोंबिवली येथे या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग रंगणार आहेत.

Story img Loader