‘प्रेम’ या शब्दाचा प्रत्येक जण आपल्या सोयीने अर्थ काढत असतो. प्रेमाची व्याख्या, प्रेमाची रूपे देखील सर्वासाठी वेगळी असतात. काहीशा ह्याच संकल्पनेवर आधारित ‘प्रेमवारी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. शिर्डी येथे साईबाबाच्या चरणी या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं.

प्रदर्शित झालेल्या पोस्टरवर चित्रपटातील मुख्य कलाकार चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे दिसत असून हा रोमॅण्टीक चित्रपट असल्याचं पाहायला मिळत आहे. हा चित्रपट ८ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Young woman threatened suicide did scene in road accused man for making her private video viral
“का केलेस माझे खासगी व्हिडीओ व्हायरल?” तरुणीनं भर रस्त्यात घातला राडा; शेवटी आत्महत्येची धमकी दिली अन्.., पाहा धक्कादायक VIDEO
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ankush Chaudhari as Police officer
अंकुश चौधरी पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत; ‘पी. एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील लूक पोस्टर रिलीज
SORRY BUBU
SORRY BUBU : नोएडा आणि मेरठमध्ये लागले ‘SORRY BUBU’ चे पोस्टर्स; अजब पोस्टर्सची मोठी चर्चा; पोलिसांकडून तपास सुरू
Modi touches Patparganj candidate feet
Video: पंतप्रधान मोदींनी तरुण उमेदवाराला तीन वेळा केला वाकून नमस्कार; कारण काय?
Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
puneri pati married life
“पत्नी ही अर्धांगिनी आहे…”हातात पाटी घेऊन पुणेकर तरुणाने सांगितला सुखी संसाराचा कानमंत्र! पाहा Viral Video
pune video
Video : पुण्यापासून फक्त ३० किमीवर असलेले हे सुंदर ठिकाण पाहिले का? तलाव, सनसेट पॉइंट, अन् निसर्गरम्य परिसर; पाहा व्हायरल VIDEO

या चित्रपटातून मयुरीच्या रूपाने मराठी सिनेसृष्टीत एक नवीन चेहरा येत आहे. साईममित प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ‘प्रेमवारी’ या आगामी चित्रपटाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे, या चित्रपटाला मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज याने संगीत दिले. तर या सुंदर चित्रपटाचे लेखन,निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे.

Story img Loader