‘बॉय नेक्स्ट डोअर’ अशी हिंदी चित्रपटातील प्रतिमा असलेले अभिनेता आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी प्रथमच विनोदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीला जवळपास ६०-७० वर्षांपासून विनोदी चित्रपटांची परंपरा असून या परंपरेतील ‘वुई आर ऑन.. होऊन जाऊ द्या’ हा चित्रपट आहे.
‘वुई आर ऑन.. होऊन जाऊ द्या’ या चित्रपटाद्वारे हलक्याफुलक्या पद्धतीचा, खुसखुशीत नर्मविनोदाच्या बाजाचे विनोदी प्रसंग यात पाहायला मिळतील, असे पटकथाकार, सहदिग्दर्शिका आणि निर्माती संध्या गोखले यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले. अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, दिलीप प्रभावळकर, सुहासिनी परांजपे, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे अशी दिग्गज कलावंतांची मांदियाळी हे या चित्रपटाचे खास वैशिष्टय़ असल्याचे त्यांनी सांगितले.
नर्मविनोदी हलक्याफुलक्या चित्रपटांचे नायक पालेकरांनी रंगविले असले तरी त्या पद्धतीचे चित्रपट मात्र त्यांनी आतापर्यंत कधीच बनविले नव्हते.    एका सोसायटीत राहणारी दहा-बारा कुटुंबे, त्यात वेगवेगळ्या पिढीतील लोक, त्यांचे एकत्र येणे आणि प्रासंगिक विनोद अशी गुंफण केली असून यातील प्रत्येक कलावंताची स्वतंत्र व्यक्तिरेखा पडद्यावर न दिसता सगळे कलावंत त्यांच्या व्यक्तिरेखांसह दिसतील. ‘वुई आर ऑन..होऊन जाऊ द्या’ हा  ‘टीमवर्क’चा हा चित्रपट असून २९ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा