‘तारत मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याच कारणामुळे त्या मालिकेचे आजही चाहते आहेत. काही दिवसांपासून आपल्याला या मालिकेत नट्टू काका दिसत नाही आहेत. दरम्यान, आता नवीन नट्टू काका मालिकेत पाहायला मिळणार आहेत.
काही दिवसांपूर्वी नट्टू काकांची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले. त्यानंतर नट्टू काका आपल्याला मालिकेत दिसले नाही. दरम्यान, आता ही भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. तर दुसरीकडे सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर नट्टू काका यांच्या भूमिकेसाठी एका नवीन कलाकाराला निर्मात्यांनी घेतल्याचे म्हटले जातं आहे.
इन्स्टाग्रामवर तारक मेहता या मालिकेचे अपडेट देणाऱ्या एका फॅनपेजने काही दिवसांपूर्वी नट्टू काकाचा फोटो शेअर केला आहे. या नवीन अभिनेता जेठालालच्या दुकानात त्याच खुर्चीवर बसला आहे जिथे घनश्याम बसायचे. २००८ मध्ये ही मालिका प्रदर्शित झाली होती.