बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असून ती कायमच तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. प्रियांका आणि निक जोनस यांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. जानेवारी महिन्यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली होती. त्यानंतर आता प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात तिने तिला वीकेंड कशाप्रकारे घालवायला आवडतो? याबद्दल सांगितले आहे.

प्रियांका चोप्रा ही नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे आई-बाबा झाले आहे. मात्र काल रविवारचे निमित्त साधत त्यांनी एकमेकांसाठी वेळ काढला. ते दोघेही व्यस्त कामातून वेळ काढून एकत्र लाँग ड्राईव्हसाठी गेले होते. प्रियांकाने याबाबतची एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
Govinda daughter Tina Ahuja opens up about failed Bollywood career
बाबा सुपरस्टार अन् लेकीचं एका चित्रपटानंतर करिअर संपलं; गोविंदाची मुलगी म्हणाली, “मला खूप वैताग…”
priyanka chopra

प्रियांकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात ते दोघेही गाडीत एकमेकांच्या हातावर हात ठेवून बसल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना ‘हा माझा आवडता रविवार होता’, असे तिने म्हटले आहे. त्यासोबत तिने लाल रंगाचा हार्ट इमोजीही शेअर केला आहे. सध्या प्रियांकाची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

पतीवर कौटुंबिक हिंसाचाराच्या वादामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री कंगनाच्या Lock Upp मध्ये जाण्यास सज्ज, प्रोमो व्हायरल

प्रियांका चोप्राने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आई झाल्याची माहिती दिली. तिने सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला आहे. “आम्ही सरोगसीच्याद्वारे एका बाळाचे स्वागत केले आहे” असे प्रियांकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रियांका पहिल्यांदा एका मॅगझिनच्या कव्हर फोटोवर झळकली होती.

Story img Loader