अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रणौत यांच्यामधील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. दोघेजण रोज एकमेकांवर नवे आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. काल हृतिक आणि कंगनाचे एक छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे ह्रतिक रोशन गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. सुरूवातीला हे छायाचित्र ‘क्रिश थ्री’चे शूटींग संपल्यानंतरच्या पार्टीतील असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, नव्या माहितीनुसार या छायाचित्रात काही फेरफार करण्यात आल्याची शक्यता आहे. याशिवाय, हे छायाचित्र अर्जून रामपालने २०१० साली दिलेल्या एका पार्टीतील असल्याची नवी माहितीही पुढे आली आहे. विशेष गोष्ट म्हणजे या पार्टाला ह्रतिकची माजी पत्नी सुझानदेखील उपस्थित होती.
यावेळी ह्रतिक, सुझान, दिनो मोरिया, डिझायनतर नंदिता महातानी , अर्जून रामपाल आणि कंगना रणौतने काही छायाचित्र काढली होती. काल व्हायरल झालेले हृतिक-कंगनाचे छायाचित्र याच छायाचित्रांचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्टीत काढलेल्या अनेक छायाचित्रांमध्ये कंगना आणि ह्रतिक एकत्र आहेत. या छायाचित्रातील आणि काल व्हायरल झालेल्या छायाचित्रामधील कंगनाचा निळ्या रंगाचा ड्रेसही सारखाच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे व्हायरल झालेले छायाचित्र मूळ छायाचित्र कापून तयार करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याशिवाय, दोघांमध्ये जवळीक असल्याचे दिसावे, यासाठी छायाचित्रातील ह्रतिक आणि कंगनाची छबी जाणीवपूर्वक मोठी करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा