मि.परफेक्शनिस्ट आमिर खानच्या आगामी ‘पीके’ चित्रपटाचा पहिला पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. नग्नअवस्थेत असलेल्या आमिरच्या पहिल्या पोस्टरला चांगला आणि वाईट असा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. काहींनी त्याच्या या पोस्टरची प्रशंसा केली तर काहींनी खिल्ली उडवली. कानपूरमधील एका वकीलाने त्याविरुद्ध याचिकादेखील दाखल केली होती. क्षुल्लक प्रसिद्धीसाठी आमिरने पोस्टरवर नग्न अवतारात येण्याचा मार्ग निवडल्याची टीका अनेकांकडून केली जात. मात्र, या पोस्टरच्या माध्यमातून निव्वळ प्रसिद्धी साधण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे आमिरने स्पष्ट केले. त्यानंतर आता १५ ऑगस्टला या चित्रपटाचा दुसरा पोस्टर प्रदर्शित होणार आहे. आता हा पोस्टर पुन्हा एक नवा धक्का देतो का ते लवकरच कळेल.

Story img Loader