‘सारी के फॉल सा’, ‘मत मारी’ आणि ‘गंदी बात’ या नृत्यपर गाण्यानंतर ‘आर. राजकुमार’चे निर्माते ‘धोका धाडी’ हे गाणे प्रदर्शित करणार आहेत. सोनाक्षी आणि शाहीदवर हे रोमॅण्टिक गाणे चित्रीत करण्यात आले आहे. हिरोगिरी अंदाजात शाहीद बुलेटपासून सोनाक्षीला वाचवतो आणि त्यानंतर या दोघांमधील रोमॅण्टिक गाण्याला सुरुवात होते. परदेशातील रम्य ठिकाणे, धबधबे आणि समुद्रकिनारी गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

बॉलीवूडमध्ये सध्या गाजत असलेल्या अरिजीत सिंगने हे गाणे गायले आहे. ‘आशिकी २’ आणि ‘राम लीला’मधील गाण्यांना आवाज देऊन अरिजीतने सर्वांवर जादू केली आहे.

अरिजीतला पलक मुंचलने गाण्यात साथ दिली असून, प्रितमने यास संगीतबद्ध केले आहे.

सोनू सूद, मुकुल देव आणि असरानी यांचीही भूमिका असलेला प्रभूदेवाचा ‘आर.राजकुमार’ ६ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

Story img Loader