कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेत अनेक दिवसांपासून देवीच्या शोधात असलेल्या देवप्पाला अखेर सत्यवाच्या रुपात देवीचे दर्शन झाले आहे. आता बाळू सत्यवला देवप्पापासून कसे वाचवेल, कसे दूर ठेवेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गावात अनेक रंजक घडामोडी घडत असून प्रेक्षकांना बाळूची गोष्ट सगळ्याचं भावतेय. हे सगळे घडत असतानाच गावावर एक नवं संकट चालून आले आहे.

पिंगळा येऊन गावात काहीतरी वाईट घडणार असल्याचे संकेत देतो. आता हे संकट काय आहे, ही देवप्पाचीच कुठली चाल तर नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. गावामध्ये पंचाच्या बायकोला म्हणजेच अक्काला वेगवेगळे आवाज ऐकू येत आहेत. आता हे आवाज कसले आहेत, पंचाच्या बायकोला का ऐकू येत आहेत हे कुणालाच माहिती नाही. बाळू या दोघांना कुठल्याही गोष्टीचा लोभ ठेऊ नका अये का निक्षून म्हणणार आहे. गावावर कुठले संकट येणार आहे, हे लोभाचे आमिष कुणाचा घात करणार आणि बाळू या अघटितावर कशी मात करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. याआधीही देवाप्पाने पंचाला थेट आव्हान दिलं होतं त्यामुळे ही देवाप्पाची खेळी आहे की पिंगळाचं भाकीत खरं ठरणार हे लवकरच कळेल. ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होते.

Story img Loader