स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शिकलेली मुलगी सून म्हणून नको या मताशी ठाम असणाऱ्या जीजी अक्कांसमोर किर्तीच्या शिक्षणाचं सत्य उघड होतं. किर्तीने इतकी मोठी गोष्ट सर्वांपासून लपवली या गोष्टीचा जीजी अक्कांना खूप त्रास होतो आणि त्या किर्तीला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किर्तीसाठी हा काळ खूपच कसोटीचा आहे. आई-वडिलांचं छत्र नाही. दादा-वहिनीदेखील कामानिमित्ताने परदेशी गेले आहेत. त्यामुळे किर्ती अतिशय दु:खी आहे. खरंतर तिच्या शिक्षणाविषयी तिने जीजी अक्कांना बऱ्याचदा सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झालं नाही. त्यामुळेच जीजी अक्कांच्या रागाचा किर्तीला सामना करावा लागतो आहे. या परिस्थितीत किर्तिला शुभमची साथ मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. त्यामुळे मालिकेचे यापुढील भाग अतिशय उत्कंठावर्धक आणि मनोरंजनाने परिपूर्ण असतील.

पाहा फोटो : नथ एक नखरे अनेक…मराठी अभिनेत्रींचा अनमोल दागिना

‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका दररोज रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New twist in marathi serial phulala sugandh maticha ssv