एका रात्रीत स्टार झालेली प्रिया वॉरियरचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या नवीन व्हिडिओमध्ये ती आपल्या मित्र परिवारासोबत मॉलमध्ये फिरताना दिसत आहे. प्रिया प्रकाशचा ‘ओरू अदार लव’ या आगामी सिनेमातील ‘मानिक्य मलाराया पूवी’ गाण्यातील एक दृश्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. या व्हिडिओमध्ये ती डोळ्यांच्या हावभावांनी प्रियकराला आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. यू- ट्युब आणि सोशल मीडियावर प्रियाचे हे गाणे लाखो लोकांनी पाहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रियाच्या नवीन व्हिडिओमध्ये प्रियाने लाल रंगाचा वन पीस घातला आहे. मॉलमध्ये ती तिच्या चाहत्यांना भेटत होती आणि त्यांच्यासोबत सेल्फीही काढत होती. या व्हिडिओला प्रियाच्या फॅन पेज ग्रृपवरुन शेअर करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार प्रियाने तिच्या हावभावांनी संपूर्ण देशाचे मन जिंकले होते. बॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींनी प्रियाने गुगल सर्चमध्ये मागे टाकले होते. आपल्या डोळ्यांच्या हावभावांनीन साऱ्या देशाला वेड लावणारी प्रिया एका रात्रीत स्टार झाली होती. सोशल मीडियावर तिचे ५० लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

१८ वर्षीय प्रिया केरळला राहत असून ती बी-कॉमच्या पहिल्या वर्षात आहे. तिच्या आगामी सिनेमातही ती एका विद्यार्थिनीची भूमिका साकारत आहे. प्रियाची प्रसिद्धी लक्षात घेता तिला अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करण्यासाठी विचारण्यात आले आहे. पिंक सिनेमाचे दिग्दर्शक अनिरुद्ध राय चौधरी यांनी प्रियाला त्यांच्या आगामी सिनेमात काम करण्यासाठी विचारले होते. पण प्रियाने मात्र त्यांच्या सिनेमात काम करण्यास स्पष्ट नकार दिला.