मी दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते. नवीन काही तरी शिकते. तसंच २०१६मध्येदेखील मी नवीन अॅडव्हेचर करणार आहे. स्कूबा डायविंग, स्काय डायविंग असे भन्नाट अॅडव्हेचर प्रकार मला माझ्या मित्र-मैत्रिणीसोबत एन्जॉय करायचे आहेत. नुकतीच आमची वन वे तिकीट सिनेमाची टीम स्पेन, इटली आणि फ्रांसमध्ये क्रूझवर शूट करून आली. तो अनुभव देखील खूप मस्त होता. त्याठिकाणी बऱ्याच गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या.
अभिनेत्री-  अमृता खानविलकर

Story img Loader