अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल’ या भारतीय चित्रपट व माहितीपटांच्या महोत्सवात मराठी चित्रपट, दिग्दर्शक आणि कलावंतांनी विविध विभागाच्या नामांकनांमध्ये बाजी मारली. सध्या हा महोत्सव न्यूर्याकमध्ये सुरू असून ज्येष्ठ लेखक-नाटककार रत्नाकर मतकरी दिग्दर्शित ‘इन्व्हेस्टमेंट’ या चित्रपटाला सवरेत्कृष्ट चित्रपटासह चार नामांकने मिळाली असून गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘अनुमती’ या चित्रपटाला सवरेत्कृष्ट चित्रपटासह तीन नामांकने मिळाली आहेत.
‘इंडो-अमेरिकन आर्ट्स कौन्सिल’तर्फे आयोजित पाच दिवसांच्या ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल’चे यंदाचे तेरावे वर्ष आहे. दिवंगत इस्माईल र्मचट, चित्रकार मकबूल फिदा हुसैन, शबाना आझमी, दीपा मेहता, मीरा नायर, शशी थरूर अशा दिग्गजांचा सल्लागार समितीत समावेश असलेल्या या महोत्सवाचे कार्यकारी संचालक अरूण शिवदासानी असून न्यूयॉर्क आणि अमेरिकी समाजाला भारतीय चित्रपटांद्वारे भारताची खरी ओळख करून देण्याच्या कल्पनेतून महोत्सव सुरू करण्यात आला. ‘अनुमती’साठी गजेंद्र अहिरे यांना सवरेत्कृष्ट दिग्दर्शन विभाग तर विक्रम गोखले यांना यातील प्रमुख भूमिकेसाठी सवरेत्कृष्ट अभिनेता गटामध्ये नामांकन मिळाले आहे. ‘इन्व्हेस्टमेंट’ चित्रपटाला सवरेत्कृष्ट पटकथा नामांकन मिळाले असून त्याचबरोबर यातील भूमिकेसाठी सवरेत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सुप्रिया विनोद यांना नामांकन मिळाले आहे. तर बालकलाकार प्रहर्ष नाईक यालाही याच चित्रपटासाठी सवरेत्कृष्ट बालकलाकार विभागात नामांकन मिळाले आहे. सवरेत्कृष्ट अभिनेता गटात ‘पुणे ५२’ या चित्रपटासाठी अभिनेता गिरीश कुलकर्णी यांना नामांकन मिळाले असून याच चित्रपटासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले आहे. अन्य भारतीय चित्रपटांमध्ये हंसल मेहता दिग्दर्शित ‘शहीद’ हा वास्तववादी घटनेवर आधारित चित्रपटही नामांकनांमध्ये गौरविला गेला असून त्याशिवाय अजय बहल दिग्दर्शित ‘बी ए पास’, डॉ. बिरजू दिग्दर्शित ‘कलर ऑफ स्काय’, गौतम घोष दिग्दर्शित बंगाली चित्रपटही आहे.

Story img Loader