Radhika Merchant: एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजिक शैला मर्चंट यांची लाडकी मुलगी राधिका मर्चंट आता अंबानींची धाकटी सून झाली आहे. मुकेश व नीता अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानींशी राधिका लग्नबंधनात अडकली आहे. १२ जुलैला जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये अनंत-राधिकाचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. पारंपरिक हिंदू रिती-रिवाजानुसार दोघांची लग्नगाठ बांधली गेली. सध्या अनंत-राधिकाच्या शाही लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अशातच नवविवाहित राधिकाच्या सुंदर हिऱ्याच्या अंगठीचे आणि मंगळसूत्राचे फोटो समोर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या कित्येक महिन्यांपासून अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाकडे फक्त देशाचं नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. दोघांचा साखरपुडा झाल्यापासून अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अनंत-राधिकाचे दोन प्री-वेडिंग मोठ्या धुमधडाक्यात पार पडले. त्यानंतर सामूहिक विवाह सोहळा, मामेरू समारंभ, गरबा नाईट्स, संगीत समारंभ, हळद, मेहंदी, ग्रह शांती पूजा, शिव शक्ती पूजा असे कार्यक्रम पाहायला मिळाले. अखेर १२ जुलैला अनंत-राधिका पती-पत्नी झाले. देश-विदेशातील दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत दोघांचा शाही लग्नसोहळा झाला. त्यानंतर १३ जुलैला ‘शुभ आशीर्वाद’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातील राधिकाच्या काही फोटोंमधून तिची हिऱ्याची अंगठी आणि मंगळसूत्र पाहायला मिळालं.

हेही वाचा – Aishwarya Rai Bachchan: घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या-अभिषेकचा ‘तो’ फोटो अन् व्हिडीओ व्हायरल, अनंत अंबानीच्या लग्नात दोघं…

राधिकाची साखरपुड्याची व लग्नाची हिऱ्याची अंगठी खूपचं खास आहे. या अंगठीवर राधिका आणि अनंतच्या नावातील पहिलं इंग्रजी अक्षर ‘RA’ लिहिलं असून या अक्षरांमध्ये हिऱ्याचं हार्ट आहे. राधिकाची ही पूर्ण अंगठी हिऱ्यांनी जडलेली आहे.

राधिका मर्चंटची अंगठी (फोटो सौजन्य – सोशल मीडिया )

तसंच नवविवाहित अंबानींच्या धाकट्या सुनेचं मंगळसूत्र ही तितकंच खास आहे. साधं पण तितकंच सुंदर असं काळ्या मण्यांचं राधिकाचं मंगळसूत्र आहे. तिच्या या मंगळसूत्राने आणि हिऱ्याच्या अंगठीने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

राधिका मर्चंटचं मंगळसूत्र (फोटो सौजन्य – सोशल मीडिया )

हेही वाचा – Emraan Hashmi: “मला ऐश्वर्या राय-बच्चनची माफी मागायची आहे”, इमरान हाश्मीला अभिनेत्रीसंबंधित ‘त्या’ वक्तव्यामुळे झाला पश्चाताप, म्हणाला…

अनंत-राधिकाची प्रेमकहाणी (Anant-Radhika Love Story)

दरम्यान, अनंत-राधिकाच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायचं झालं तर, दोघं लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. दोघं एकत्रच मोठे झाले. त्यामुळेच लहापणापासूनच दोघांची चांगली मैत्री होती. याच मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. पण त्यानंतर दोघांनी लगेच आपल्या नात्याचा खुलासा माध्यमांसमोर केला नाही. २०१८मध्ये पहिल्यांदा अनंत-राधिकाचा रोमँटिक फोटो समोर आला होता. त्यानंतर दोघं अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसू लागले. २०२०मध्ये करोना काळात अनंत-राधिका जामनगरमध्ये अडकले होते. त्यावेळेस राधिकाने अनंतवर प्रेम करत असल्याचा खुलासा केला होता. अनंतने देखील आपल्या प्रेमाची अनेकदा कबुली दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे अनंतच्या आजारपणात राधिकाने नेहमी त्याची साथ दिली. त्यामुळे अनंत पत्नी राधिकाला आपली ताकद मानतो आणि स्वतः नशीबवान असल्याचं सांगतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Newly married radhika merchant flaunt her mangalsutra and wedding ring pps