अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचं लग्नानंतरचं सेलिब्रेशन जोरदार सुरू आहे. रणवीरची बहीण रितिका भवनानी हिने मुंबईत नवविवाहित दाम्पत्यासाठी जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. दीप-वीरच्या सोशल मीडियावरील विविध फॅन पेजेसवर या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले. विशेष म्हणजे या पार्टीतील रणवीर आणि दीपिकाच्या हटके लूकनं सर्वांचं लक्ष वेधलं.

या पार्टीला मुंबईतल्या जवळच्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. फॅशन डिझायनर मनिष अरोरा यांनी रणवीरच्या पार्टीसाठी कपडे डिझाइन केले होते. इटलीतील लग्नसोहळा आणि बेंगळुरूमधील रिसेप्शननंतर दीप-वीरची ही पहिली पार्टी होती. या पार्टीत दोघांनी एकत्र मनमुराद डान्स केला.

https://www.instagram.com/p/Bqk_tsmg_Gk/

https://www.instagram.com/p/BqlobYdA9Fn/

https://www.instagram.com/p/BqkbqqUgn6w/

मुंबईत आणखी दोन रिसेप्शन पार पडणार आहेत. बॉलिवूडमधल्या मित्रमंडळींसाठी १ डिसेंबर रोजी रिसेप्शन आयोजित करण्यात येणार आहे तर रणवीरच्या नातेवाईकांसाठी आणखी एक रिसेप्शन मुंबईत होणार आहे.