‘नागिन’ फेम अभिनेत्री निया शर्मा तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. सोशल मीडियवर देखील निया चांगलीच सक्रिय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे निया कायमच चर्चेत असते. तसंच हॉट फोटोंमुळे नियाला अनेकदा ट्रोलही व्हावं लागतं. ट्रोल करणाऱ्यांकडे निया फारसं लक्ष देत नाही. नियाने नुकत्यात शेअर केलेल्या काही बोल्ड फोटोंमुळे ती पुन्हा एकदा ट्रोल झाली होती. यावेळी मात्र नियाने ट्रोल करणाऱ्याला हटके अंदाजात उत्तर दिलंय.
नियाने नुकताच मैत्रिणीसोबत डान्स करतानाचा एक व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले होते. यामध्ये नियाने एक बॅकलेस टॉप परिधान केलंय. व्हिडीओत निया तिची बॅक फ्लॉन्ट करताना दिसतेय. नियाच्या या टॉपवरून तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होत. या ट्रोल करणाऱ्यांना नियाने एक व्हिडीओ शेअर करत उत्तर दिलंय. नियाने एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तिने तेच काळ्या रंगाचं बॅकलेस टॉप परिधान केलंय. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “बॅकलेस टॉप परिधान करताना निष्काळजी करू नका” तर पुढे ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत तिने लिहिलंय. “हे पण काढून टाक, कपडे नाही का, निर्लज्ज…. हे म्हणणाऱ्यांसाठी” असं म्हणत नियाने ट्रोल करणाऱ्यांना तिच्या व्हिडीओच्या माध्यामातून उत्तर दिलंय.
पहा फोटो: “करीना आणि सैफ मुघलांची आयपीएल टीम बनवत आहेत”, दुसऱ्या मुलाच्या नावावरून करीना कपूर ट्रोल
या आधी देखील निया शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेकदा बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे नियाला अनेकदा ट्रोल करण्यात आलंय. मात्र नियाने या ट्रोलर्सकडे वेळोवेळी दूर्लक्ष केलं.