बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनस यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ते दोघे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते सोशल मीडियावकर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. यावेळी निकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तो वयाच्या १३ व्या वर्षापासून मधुमेहाने त्रस्त असल्याचा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तो टाइप १ मधुमेहाने त्रस्त असल्याचे सांगितले आहे. “मी तेरा वर्षांचा होतो, माझ्या भावांसोबत शो खेळत होतो.. आणि काहीतरी चुकीच आहे हे मला माहीत होतं, म्हणून मी माझ्या आई-वडिलांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की मला डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे. माझी लक्षणे पाहिल्यानंतर, माझ्या बालरोगतज्ञांनी मला सांगितले की मला टाइप १ मधुमेह आहे. टाइप १ च्या मधुमेहाचे निदान नव्हते”, असे निक म्हणाला.

आणखी वाचा : करिश्मा कपूरने सांगितला ‘त्या’ किंसिंग सीन शूट दरम्यानचा किस्सा

पुढे निक म्हणाला, “मी घाबरलो होतो… याचा अर्थ संपूर्ण जगाचा दौरा करण्याचे आणि आमची गाणी सगळीकडे गाण्याचे माझे स्वप्न तिथेच संपले का? पण मी स्वत:ला वचन दिले होते, जे मी नेहमी करत आलो आहे, यामुळे माझा प्रवास हळू होणार नाही. हे कठीण दिवस आहेत मात्र, माझ्याकडे आधार आहे ज्यामुळे मी मलाच मदत करू शकतो हे मला माहित आहे आणि जेव्हा मला वाईट वाटते तेव्हा मी स्वत:कडे दुर्लक्ष केले नाही पाहिजे. त्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याची स्तुती केली आहे. तर प्रियांकाने देखील कमेंट करत त्यांची स्तुती केली आहे.”

आणखी वाचा : आई बंगाली आणि वडील जर्मन मग मुस्लीम आडनाव का लावते दिया मिर्झा?

निकच्या मधुमेहाच्या लढाईत प्रियांका त्याची पूर्ण साथ देते. प्रियांका त्याच्या वर्कआऊटपासून त्याच्या खाण्या-पिण्यावर पूर्ण लक्ष देते. प्रियांका आणि निकने २०१८ मध्ये जयपूरमध्ये लग्न केले. तर त्याच वर्षी मे मध्ये ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nick jonas emotional post on his struggle with diabetes since the age of 13 priyanka chopra cheers him up dcp