बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका चोप्रा ही सध्या भारतात आहे. प्रियांका चोप्रा ही काही दिवसांपूर्वीच आई झाली असून तेव्हापासून ती सातत्याने चर्चेत आहे. प्रियांका चोप्राचा पती अमेरिकन गायक निक जोनस हा आता चर्चेत आला आहे. निक जोनसने प्रियांका चोप्राबरोबर लग्न करण्यापूर्वी अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडची यादी फारच मोठी आहे. निक जोनसच्या एक्स गर्लफ्रेंडच्या यादीत अभिनेत्री आणि मॉडेल ऑलिव्हिया कल्पो हिच्याही नावाचा समावेश आहे. नुकतंच ऑलिव्हिया कल्पोने निकबरोबरच्या ब्रेकअपबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

निक जोनस आणि ऑलिव्हिया कल्पो हे दोघेही एकमेकांना दोन वर्षे डेट करत होते. त्यानंतर मात्र त्यांचा ब्रेकअप झाला. निक जोनासबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर ऑलिव्हिया कल्पोने याबद्दल मौन सोडले आहे. अलीकडेच ऑलिव्हिया कल्पोने ‘द कल्पो सिस्टर्स’ शोच्या प्रीमिअर एपिसोडमध्ये निक जोनसबरोबरचे रिलेशनशिप, ब्रेकअप यासह अनेक गोष्टींवर उघडपणे भाष्य केले आहे.
आणखी वाचा : “लग्नानंतर मी निकसाठी अनेक रात्री जागून काढल्या कारण…”, प्रियांका चोप्राने केला धक्कादायक खुलासा

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?

पीपल या मासिकाने दिलेल्या माहितीनुसार, ऑलिव्हियाने ‘द कल्पो सिस्टर्स’ ला एक मुलाखत दिली. त्यात तिने निक जोनासबरोबरच्या ब्रेकअपबद्दल सांगितले. त्यावेळी ती म्हणाली, “माझे निकवर जीवापाड प्रेम होते. पण निकने मात्र माझ्याबरोबर ब्रेकअप केले. निक जोनससाठी मी लॉस एंजेलिसला स्थायिक झाले होते. त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. माझी ओळख नव्हती. पण फक्त त्याच्या प्रेमासाठी मी तिथे स्थायिक झाले. मी सर्व काही सोडून लॉस एंजेलिसला गेली होती.”

“निकबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर मी पूर्णपणे उद्धवस्त झाले. माझी स्वत:ची काहीही ओळख राहिली नव्हती. माझी कथा ही एखादा सर्वसामान्य व्यक्तीच्या प्रेमात पडलेल्याप्रमाणेच आहे. निक जोनस माझ्याशी लग्न करेल असे मला वाटते होते. मी या सर्व गोष्टींचा विचारही करत होती आणि अचानक एके दिवशी माझे जग बदलून गेले.” असेही तिने सांगितले.

आणखी वाचा : मुलीच्या जन्मानंतर अलियाच्या पोस्टवर दीपिका- कतरिनाच्या प्रतिक्रिया, कमेंटने वेधलं लक्ष

“मी एकदा माझ्या घरात बसली होती. तेव्हा मी माझ्या घराचे भाडे कसे देणार, खायला पैसे कुठून आणणार असा प्रश्न मला पडला होता. त्यावेळी माझ्याकडे खायलाही पैसे नव्हते. पण मी त्यावेळी पराभव स्वीकारायचा नाही, असे ठरवले होते. या इंडस्ट्रीमध्ये कोणाला कधीही प्रेम मिळू शकते. मी निक जोनससाठी खूप आनंदी आहे. त्याला त्याचे प्रेम मिळाले असेल अशी मी आशा करते”, असेही ऑलिव्हिया कल्पो म्हणाली.

दरम्यान ऑलिव्हिया कल्पोच्या या वक्तव्यानंतर अनेक चर्चा व्हायरल होताना दिसत आहे. त्यावर अनेकजण विविध प्रतिक्रियाही मांडताना दिसत आहे. सध्या ऑलिव्हिया कल्पो ही अमेरिकन फुटबॉलर क्रिस्टियन मॅककॅफ्रेला डेट करत आहे.

Story img Loader