बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती आणि गायक निक जोनास सध्या त्याच्या आयुष्यातील नव्या इनिंगचा आनंद घेत आहे. सध्या निक जोनस त्याच्या आयुष्यात एका चांगल्या पती असण्यासह एका उत्तम वडिलांची भूमिकाही निभावताना दिसत आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास काही महिन्यांपूर्वीच सरोगसीच्या मदतीने आई-बाबा झाले आहेत. निक आणि प्रियांकाने २०१८ मध्ये लग्न केलं होतं. मात्र प्रियांकाशी लग्न करण्यापूर्वी निकने अनेक मुलींना डेट केले होतं ज्यात अभिनेत्री सेलेना गोमेझचाही समावेश होतां.
निक जोनास आणि सेलेना गोमेझ यांनी २००८ मध्ये काही महिने एकमेकांना डेट केलं होतं. निक त्याआधी मायली सायरसला डेट करत होता. सेलेना गोमेझ आणि निक जोनस यांच्या ब्रेकअपच्या काही दिवसांनंतर, जेव्हा सेलेनाला एका चॅट शोमध्ये निकला डेट करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचीच बोलती बंद झाली होती.
आणखी वाचा- सर्वांसमोर कपिलने केली ‘कॉफी विथ करण’ शोची थट्टा, उतरला होता करण जोहरचा चेहरा
२०१८ मध्ये, चॅट शो होस्ट अँडी कोहेनने सेलेनाला निक जोनासच्या लैंगिकतेबद्दल एक प्रश्न विचारला होता, ज्यावर तिने खूप मजेदार उत्तर दिलं होतं. या शोमध्ये अँडी सेलेनाला उद्देशून म्हणाला होता, “निक जोनास, दिवसेंदिवस अधिक हँडसम दिसत आहे. निकने अलिकडेच ‘स्क्रीम क्वीन्स’ आणि ‘किंगडम’मध्ये ‘गे’ची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता सर्व समलैगिकांना निकने गे व्हावं असं वाटतं. अर्थात मला असं नाही वाटत. पण जर निकला गे म्हणून गुण द्यायचे झाले तर तू त्याला १ ते १० मधील किती गुण देशील? मी तर त्याला गे म्हणून १० पैकी १० गुण देऊ इच्छितो. तर मला सांग निक जोनास गे म्हणून तुला कसा वाटतो?”
आणखी वाचा- प्रियांका चोप्रा ठरतेय ‘टिपिकल इंडियन मॉम’? लेकीला नजर लागू नये म्हणून करते ‘हे’ काम
अँडीच्या बोलण्यावर उत्तर देताना सेलेना म्हणाली, “मी त्याला डेट केले आहे, त्यामुळे शून्य गुण देणं पसंत करेन.” २०१६ मध्ये सेलेनाला विचारण्यात आले होते की, “निकला डेट केल्यानंतर तिचं आणि मायली सायरसचं भांडण झालं होतं का?” यावर सेलेनाने डब्ल्यू मॅगझिनशी संवाद साधताना म्हटलं होतं, “आमच्यामध्ये कोणतेही भांडण झाले नाही. आम्ही १६ वर्षांच्या असताना दोघींनाही एकच तरूण आवडला होता.” दरम्यान आता निक आणि सेलेना आपापल्या आयुष्यात व्यग्र आहेत.