प्रियांका आणि निक जोनासचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. परिकथेला शोभेल असा हा सोहळा होता. १ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीनुसार प्रियांका आणि निकनं लग्न केलं. या लग्नातील एका भावूक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रियांकाला लग्नाच्या वेशात येताना पाहून निक खूपच भावूक झाल्याचं या व्हिडिओमधून दिसत होतं.
आईचा हात हातात घेऊन पांढऱ्या रंगाच्या वेडिंग गाऊनमध्ये आलेल्या प्रियांकाला पाहून निकच्या डोळ्यात अश्रू तरळले. आपल्या भावनांवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न निक करू लागला. हा क्षण कोणाच्याही नजरेतून सुटला नाही. माझ्या आयुष्यातील हा सर्वात सुंदर क्षण असल्याचं नमुद करत निकनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या सोहळ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या सोहळ्यासाठी प्रियांकानं खास राल्फ लॉरेन या प्रसिद्ध डिझायनर तयार केलेला वेडिंग गाऊन परिधान केला होता. यापूर्वी कधीही या ब्रँडनं कोणत्याही सेलिब्रिटीसाठी वेडिंग गाऊन डिझाइन केला नव्हता. त्यामुळे प्रियांकासाठी पहिल्यांदाच वेडिंग गाऊन तयार करण्याची इच्छा या ब्रँडनं स्वत:हून बोलून दाखवली होती.