अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिकाचं लग्न आणि रिसेप्शन पार्टी दोन्ही पार पडल्यानंतर आता चाहत्यांना ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाचे वेध लागले आहेत. त्यातच निकने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करुन तो लग्नासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निक आणि प्रियांका राजस्थानमधील जोधपूर येथील उम्मेद भवनमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. येत्या २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या पाच दिवसामध्ये निक-प्रियांकाचा विवाहसोहळा रंगणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यासाठीच निक न्युयॉर्कमधून भारताच्या दिशेने रवाना झाला आहे. निकने विमानात बसल्याचा व्हिडिओ इन्स्टावर शेअर करत न्युयॉर्क लवकरच परत येईन असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, प्रियांका सध्या तिच्या आगामी ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दिल्लीमध्ये आहे. त्यामुळे निक प्रथम दिल्लीत जाणार कि थेट जोधपूरमध्ये हे स्पष्ट झालेलं नाही. विशेष म्हणजे निक-प्रियांकानेदेखील डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य दिलं असून पारंपारिक पद्धतीने हा विवाहसोहळा रंगणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nick jonas heads to india for wedding
Show comments