सुप्रसिद्ध अमेरिकन गायक व बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनास भारतात आला आहे. निक त्याच्या भावांबरोबर मुंबईत आला असून त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत प्रियांका चोप्रा दिसत नाही. खरं तर प्रियांका चोप्रा यावेळी निकबरोबर आली नाही, कारण निक व त्याचे भाऊ म्हणजेच जोनास ब्रदर्स यांचा मुंबईत कॉन्सर्ट होणार आहे, त्यासाठी ते आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२७ व २८ जानेवारीला मुंबई पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठ्या संगीत महोत्सवांपैकी एक असलेल्या ‘लोलापलूझा’चं आयोजन करण्यात आलं आहे. या दोन दिवसांच्या संगीत महोत्सवात जगभरातील संगीत क्षेत्रातील दिग्गज परफॉर्म करतील. या यादीत स्टिंग, जोनास ब्रदर्स, हॅलसी, लॉ, वन रिपब्लिक आणि द रोज यांचा समावेश आहे. याठिकाणी दोन दिवसात जवळपास ४० कलाकार परफॉर्म करणार आहेत.

“माझा व काजोलचा किसिंग सीन मी पत्नी अन् मुलीबरोबर पाहिला”, अभिनेत्याचा खुलासा; त्यांची प्रतिक्रिया सांगत म्हणाला…

जोनास ब्रदर्स यांचा परफॉर्मन्स आज (२७ जानेवारी रोजी) होईल. त्यासाठी ते मुंबईत दाखल झाले आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. ज्यात जोनास ब्रदर्सच्या मुंबईतील कॉन्सर्टबद्दल माहिती दिली होती. पतीच्या भारतातील कॉन्सर्टबद्दल आपण खूप उत्सुक असल्याचं प्रियांका म्हणाली होती.

दरम्यान, जोनास ब्रदर्सचा भारतातील हा त्यांचा पहिला परफॉर्मन्स असेल. हा कार्यक्रम मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स इथे होणार आहे. व्हेन चाय मेट टोस्ट, पारेख अँड सिंग आणि सितार वादक अनुष्का शंकर यासारख्या भारतीय कलाकारांसह जगभरातील कलाकार या दोन दिवसांच्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करतील.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nick jonas in india without priyanka chopra jonas brothers to perform in mumbai see video hrc