Nick Jonas : बॉलीवूडची देसी गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांका चोप्राचा पती निक जोनस सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा प्राग येथील कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. निक हा हॉलीवूडचा लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. नुकत्याच एका कॉन्सर्टमध्ये त्याला परफॉर्मन्स सोडून स्टेजवरून चक्क पळ काढावा लागला. याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. यादरम्यान नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निक जोनसचा कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल

निक जोनस ( Nick Jonas ) सध्या त्याच्या म्युझिक कॉन्सर्टची वर्ल्ड टूर करत आहे. नुकताच जोनस ब्रदर्सचा शो प्रागमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी एक धक्कादायक घटना घडली. लाइव्ह परफॉर्म करताना आपल्याला कोणीतरी लेझर लाइटच्या माध्यमातून लक्ष्य केलं आहे हे निकला लगेच समजलं आणि त्याने तात्काळ कॉन्सर्टमधून पळ काढला.

निकने ( Nick Jonas ) त्याच्याबरोबर असलेल्या सुरक्षा रक्षकांना इशारा करुन स्टेजवरून खाली उतरून बाहेरच्या दिशेने धाव घेतली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल तुफान होत आहे. एवढंच नव्हे तर, एका व्हायरल व्हिडीओमध्ये निकवर लेझर लाइटने कसा निशाणा साधला गेला…हे देखील स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : अर्जुनच्या हाती लागला सर्वात मोठा पुरावा! चैतन्यने दिली साक्षीबद्दलची हिंट, आता कोर्टात काय घडणार? पाहा प्रोमो

हेही वाचा : Video : प्रथमेश परबचा बायकोसह ‘झापुक झुपूक’ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकऱ्यांना आठवला सूरज चव्हाण, व्हिडीओ व्हायरल

निकला ( Nick Jonas ) भर कॉन्सर्टमधून अशाप्रकारे बाहेर पडावं लागल्याने त्याच्या चाहत्यांनी गायकाच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आता चाहत्यांसह नेटकरी निक जोनसच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर जोनस ब्रदर्संना त्यांचा शो त्वरीत थांबवावा लागला. यानंतर सुरक्षारक्षकांनी शोधाशोध केल्यावर प्रेक्षकांमधील एका व्यक्तीने निकच्या डोक्यावर लेझर लाइट मारल्याचं समोर आलं. या व्यक्तीला कॉन्सर्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि काही वेळाने कॉन्सर्टला पुन्हा एकदा सुरुवात झाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nick jonas ran off stage during concert in prague sensing threat someone points a laser at him video viral sva 00