ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस यांची जोडी जगभरात लोकप्रिय आहे. निक जोनस हॉलीवूडचा प्रसिद्ध गायक म्हणून ओळखला जातो. अनेक ठिकाणी त्याचे शो होतात तसेच जोनस ब्रदर्सच्या कॉन्सर्टसाठी चाहतेही मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. अशाच एका लाइव्ह कार्यक्रमामुळे निक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
हेही वाचा : “ज्या लोकांची लायकी नाही…”, नवऱ्याची बाजू घेत क्रांती रेडकरने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “मला खरंच वाईट…”
निक जोनसच्या लाइव्ह कॉन्सर्टमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भर कार्यक्रमात निक जोनसवर एका चाहत्याने मनगटातील रिस्ट बॅंड फेकला. हा बॅंड निकला लागल्यावर तो संतापल्याचे पाहायला मिळाले. त्याने चाहत्याला हाताने इशारा करून असे करू नकोस असे सांगितले. त्यानंतर निकने पुन्हा एकदा गाणे गाण्यास सुरुवात केली. त्याच्या या कृतीचे अनेकांनी समर्थन करत त्याचे कौतुक केले आहे.
हेही वाचा : “नाच ग घुमा”, ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या मंचावर ‘बाईपण भारी देवा’ची टीम खेळली मंगळागौर, व्हिडीओ व्हायरल
निक जोनसच्या लाइव्ह कॉन्सर्टचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “हे चुकीचे आहे त्याला लागले असते तर?” , “असे वर्तन करणे एकदम चुकीचे आहे.”, “कोणत्याही कलाकारांवर वस्तू फेकून त्यांचा अपमान करु नये” अशा कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, गेल्या महिन्यांपासून अनेक कलाकारांच्या कॉन्सर्टमध्ये असे गैरप्रकार झाल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यापूर्वी प्रसिद्ध हॉलीवूड रॅपर गायिका कार्डी बी, बॉलीवूडचा लोकप्रिय गायक अरिजित सिंह यांनाही अशा घटनांचा सामना करावा लागला होता. अरिजित सिंहने प्रकरण शांतपणे हाताळले होते, तर याउलट कार्डी बीने रागाच्या भरात हातातला माइक त्या चाहत्याच्या दिशेने फेकून मारला होता.