बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अमेरिकी गायक निक जोनसशी लग्न केले आहे. प्रियांका आणि निकला एक मुलगी असून तिचं नावं मालती आहे. पण त्यांना एक मुलगी नको तर खूप मुलं हवी आहेत.
आणखी वाचा : ‘सम्राट पृथ्वीराज’चे अपयश ‘रक्षाबंधन’ पुसणार का? पाहा ट्रेलर
या वर्षी जानेवारीमध्ये निक आणि प्रियांकाच्या घरी आनंदाची बातमी आली, सरोगसीच्या माध्यमातून हे जोडपं आई-वडील झाले आणि त्यांनी आपल्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनास ठेवले. पण निकला फक्त एक मुलगी नाही तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निकने त्याला खूप मुलं हवी आहेत असे सांगितले. दुसरीकडे प्रियांका एका मुलाखतीत म्हणाली, तिला ११ मुलं पाहिजेत. हे म्हटल्यानंतर प्रियांका जोर जोरात हसू लागली. ती पुढे म्हणाली, तिला एक क्रिकेट टीम पाहिजे आणि क्रिकेट टीमसाठी ११ मुलं गरजेचे आहेत.
आणखी वाचा : “मी महाराष्ट्रीय असल्याचा मला खूप अभिमान आहे”; वरुण धवनचे वक्तव्य चर्चेत
आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?
प्रियांका आणि निक जोनस २०१८ मध्ये लग्न बंधनात अडकले. प्रियांका आणि निकने राजस्थानमधील उम्मेद भवनमध्ये हिंदू परंपरेने आणि ख्रिश्चन परंपरेने लग्न केले.