अभिनेत्री निधी अग्रवाल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. निधीचा अशा कलाकारांच्या यादीमध्ये समावेश झाला आहे ज्यांची चाहत्यांनी मंदिरे बांधली आहेत. त्यामुळे ही निधी अग्रवाल नेमकी कोण? आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

निधी अग्रवालच्या एका चाहत्याने तिला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी खास भेट दिली आहे. त्या चाहत्याने चक्क तिचे मंदिर बांधले आहे. या संदर्भातील माहिती निधीला सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांनी दिली.

निधीने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत वक्तव्य केले आहे. ‘त्यांनी मला सांगितले की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी माझ्यासाठी ही खास भेट आहे. ते ऐकून मी हैराण झाले. मी असा कधी विचार पण केला नव्हता. पण मी खूप आनंदी आहे आणि ते माझ्यावर इतकं प्रेम करतात त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे’ असे निधी म्हणाली. हे मंदिर कुठे आहे याबाबत निधीला माहिती नव्हती. तिने हे मंदिर चैन्नईमध्ये असल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा: पूजा-गश्मीरच्या ‘त्या’ व्हायरल चॅट मागचं जाणून घ्या सत्य

पुढे निधी म्हणाली, ‘मी या इंडस्ट्रीमध्ये नवीन आहे. मी तामिळमध्ये दोन चित्रपट केले आहेत आणि तेलुगूमध्ये काही चित्रपटांमध्ये काम केले आहेत. मी सध्या दोन्ही भाषांच्या चित्रपटांसाठी चित्रीकरण करत आहे. त्यामुळे हो हे माझ्यासाठी थोडे शॉकिंग आहे. मला वाटले नव्हते की चाहते असं देखील करतील.’

आणखी वाचा: शिल्पा शेट्टीची मुलगी झाली एका वर्षाची; शेअर केलेला व्हिडीओ बघितला का?

यापूर्वी तामिळनाडूमध्ये चाहत्यांनी अनेक कलाकारांची मंदिरे बांधली आहेत. ज्यामध्ये एमजीआर, खुशबू सुंदर, हंसिका मोटवानी आणि नयनतारा अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निधीने २०१७मध्ये अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. तिने बॉलिवूडमधील ‘मुन्ना माइकल’ या चित्रपटात काम केले. त्यानंतर तिने २०१८ आणि २०१९मध्ये काही तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले. ज्यामध्ये ‘सव्यसाची’, ‘मिस्टर मजनू’, ‘आईस्मार्ट शंकर’ या चित्रपटांचा समावेश आहे. आता निधीचे ‘भूमि’ आणि ‘पूनगोडी’ हे तामिळ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.