Baby Calm Down fame Rema arrived in Mumbai: अनंत अंबानी व राधिका मर्चंट आज लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नासाठी पाहुण्यांचे मुंबईत आगमन सुरू आहे. प्रियांका चोप्रा, निक जोनास व कार्दशियन सिस्टर्स ही मंडळी गुरुवारीच मुंबईत पोहोचली. तर युकेचे माजी पंतप्रधान बोरीस जॉनसन, सॅमसंगचे सीईओ व इतर अनेक पाहुणे आज लग्नासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. आता सुप्रसिद्ध नायजेरियन रॅपर रेमा आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नायजेरियन रॅपर आणि गायक-गीतकार रेमाचे मुंबई विमानतळावरील फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तो खास अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नासाठी मुंबईत आला आहे. ‘Baby Calm Down’ या सुपरहिट गाण्याचा गायक रेमा अनंत व राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार असल्याची माहिती समोर आली आहे. रेमाला लग्नातील परफॉर्मन्ससाठी कोट्यवधी रुपयांचे मानधन देण्यात आले आहे.

अनंत-राधिकाच्या लग्नस्थळी लोकांची गर्दी, पाहा जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरचा Video

मुंबईतील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्य लग्नात परफॉर्म करण्यासाठी रेमा भारतात आला आहे. त्याचे लोकप्रिय गाणं या लग्नात गाण्यासाठी तो सहा कोटींहून अधिक रक्कम आकारत आहे, असे वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.

मुंबईकरांनो, अनंत अंबानीच्या लग्नामुळे तीन दिवस ‘या’ भागातील रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या…

अनंत राधिकाच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी नायजेरियन रॅपर रेमो मुंबईत पोहोचला आहे. काल रात्री त्याने इन्स्टाग्रामवर स्वतःची एक क्लिप शेअर केली होती, त्यात तो एका खासगी चार्टर्ड विमानाकडे चालत जाताना दिसतोय. त्यात त्याने काळ्या रंगाचे कपडे घातल्याचं दिसतंय. बॅकग्राउंडला त्याने त्याचं नवीन गाणं ‘अझमान’ वापरलं होतं. त्याच्या या पोस्टमध्ये त्याने भारतीय तिरंगा असलेला इमोजी वापरला आहे. रेमाच्या या स्टोरीनंतर तो भारतात येणार असल्याचं स्पष्ट झालं. आता तो मुंबईत पोहोचला असून आज अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार आहे.

५००० कोटींचे आलिशान घर, प्रायव्हेट जेट, तरीही डोक्यावर कर्ज अन्…; अनिल अंबानींपेक्षा श्रीमंत आहेत पत्नी टीना मुनीम

लग्नाला येणार जगभरातील पाहुणे

रेमा शिवाय डेस्पॅसिटो फेम गायक लुईस फॉन्सी देखील अनंत-राधिकाच्या लग्नाला उपस्थित राहून परफॉर्म करणार असल्याची चर्चा आहे. या लग्नासाठी जगभरातील राजकीय नेते व सेलिब्रिटी येणार आहे. डब्ल्यूडब्ल्यूई फेम जॉन सिनादेखील या लग्नासाठी भारतात येणार आहे. पंतप्रधान मोदीही या लग्नात सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Ambani Wedding : अंबानींच्या घरी पार पडली गृहशांती पूजा; अनंत-राधिकाला पाहताच मुकेश अंबानी झाले भावुक! Inside व्हिडीओ व्हायरल

संगीत नाईटमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटींची मांदियाळी

गेल्या आठवड्यात बॉलीवूड स्टार्सनी सजलेली संगीत नाईट मुंबईत पार पडली. त्यात बॉलीवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. या संगीत नाईटमध्ये रॅपर बादशाहने गायक करण औजलाबरोबर परफॉर्म केलं होतं. यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये आकारले होते. तसेच या कार्यक्रमात जस्टिन बीबरच्या परफॉर्मन्सने लक्ष वेधून घेतलं होतं. त्याला ८३ कोटी रुपये मानधन देण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nigerian rapper baby calm down fame rema charge 6 crore to perform at anant radhika wedding hrc