जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेले मुकेश अंबानी आणि निता अंबानी कायमच चर्चेत असतात. नुकतंच मुंबईतील ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ चा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अनेक मोठमोठ्या उद्योगपती, राजकारणी आणि बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात नीता अंबानी यांची मोठी सून आणि आकाश अंबानीची पत्नी श्लोकाच्या बेबी बंपने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय कला आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी उभारण्यात आलेले ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ शुक्रवारपासून प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले. या सांस्कृतिक केंद्राच्या दिमाखदार उद्घाटन सोहळय़ाला जगभरातील नामवंत कलाकारांसह अनेक उद्योजकांनी हजेरी लावली. याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आणखी वाचा : अनंत अंबानीने साखरपुड्यात घातलेला ‘कार्टियर पँथर ब्रोच’ कोणी दिला? ‘त्या’ व्यक्तीचं नाव आलं समोर

या कार्यक्रमासाठी आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी हे दोघे थोड्या उशीराने दाखल झाले. यावेळी या दोघांनी पारंपारिक कपडे परिधान केले होते. या कार्यक्रमासाठी श्लोकाने गोल्डन रंगाची साडी आणि गुलाबी रंगाची ओढणी परिधान केली होती. त्याबरोबर तिने छान ज्वेलरीही घातली होती. तर आकाशने हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. यावेळी श्लोका ही फारच सुंदर दिसत होती.

या लूकमध्ये तिच्या बेबी बंपने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिच्याकडे पाहून अनेकांनी ती गरोदर असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. ‘ही गरोदर आहे, असं वाटतंय’ अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने ‘अजून एक बाळ येणार आहे’, अशी कमेंट केली आहे. ‘ही गरोदर आहे, लवकरच गुडन्यूज मिळणार आहे’, अशी कमेंट एकाने केली आहे.

आणखी वाचा : “बेबी ऑन बोर्ड”! लग्नानंतर ६ वर्षांनी प्रसिद्ध सेलिब्रेटी जोडप्याने दिली गुडन्यूज

गेल्या अनेक महिन्यांपासून श्लोका अंबानी ही गरोदर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र याबद्दल अंबानी कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

नीता अंबानींची मोठी सून श्लोका पुन्हा गरोदर?

दरम्यान आकाश अंबानी आणि श्लोका मेहता या दोघांनी ९ मार्च २०१९ रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाला देशातील आणि जगातील अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यानंतर १० डिसेंबर २०२० रोजी श्लोकाने पहिल्या बाळाला जन्म दिला. त्याचे नाव पृथ्वी अंबानी असे ठेवले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nita ambani bahu shloka mehta flaunts her baby bump in saree during nmacc watch video nrp