Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजिक शैला मर्चंट यांची लेक राधिका मर्चंट हिच्याशी अनंत अंबानी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी अंबानी कुटुंबाने अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. आज (२ जुलै) ५० गरीब जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला स्वतः अंबानी कुटुंबातील सदस्यांनी उपस्थित राहून जोडप्यांना आशीर्वाद दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१२ जुलैला अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचं हिंदू पद्धतीनं लग्न होणार आहे. त्यानंतर १३ जुलैला शुभ आशीर्वादाचा कार्यक्रम होणार असून १४ जुलैला मोठा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या लग्नसोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रिटींसह दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. आज पालघर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे सायंकाळी ४.३० वाजता ५० गरीब जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीनं पार पडला. या सोहळ्याला मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, श्लोका अंबानी, ईशा अंबानी, आनंद पिरामल उपस्थित होते.

हेही वाचा – Video: नव्या घरात रुपाली भोसले खास मैत्रीण गौरी कुलकर्णीबरोबर थिरकली, ‘पुष्पा २’मधील ‘सूसेकी’ गाण्यावर धरला ठेका

या सामूहिक विवाह सोहळ्यात अंबानी यांनी मंगळसूत्र, कानातले, अंगठी असे दागिने देत आहेर देखील जोडप्यांना दिला. तसंच प्रत्येक जोडप्याची भेट घेऊन त्यांना अंबानी कुटुंबातील सदस्यांनी आशीर्वाद दिला. सध्या या सामूहिक लग्नसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. अशातच नीता अंबानींनी या सामूहिक सोहळ्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

माध्यमांशी बोलताना नीता अंबानी म्हणाल्या, “मी एक आई आहे. एका आईला आपल्या मुलांचं लग्न पाहून जो काही आनंद होतो, तोच आनंद आज मला होत आहे. या सर्वजणांना माझा खूप आशीर्वाद आहे. आजपासून आमची मुलं अनंत व राधिकाच्या लग्नाचे समारंभ सुरू होत आहेत. दरम्यान, हे शुभ कार्य करण्यासाठी मी इथे आले, हे माझं भाग्य आहे. मला या मुलांना पाहून खूप आनंद होत आहे. त्यांचं आयुष्य सुखकर व्हावो, हीच माझी इच्छा आहे आणि ईश्वराकडे प्रार्थना आहे. धन्यवाद.” नीता अंबानींचा हा व्हिडीओ Voompla या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’मधील स्वातीचा चिमुकल्या सईबरोबर श्रेया घोषालच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले, “आत्या आणि भाची…

दरम्यान, याआधी अनंत-राधिकाचे दोन प्री-वेडिंग सोहळे झाले. मार्च महिन्यात तीन दिवसांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा गुजरात येथील जामनगरमध्ये पार पडला. त्यानंतर २९ मे ते १ जूनपर्यंत दुसरा प्री-वेडिंग सोहळा क्रूझवर झाला. इटली ते फ्रान्स असा प्रवास करत अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा झाला. हे दोन्ही प्री-वेडिंग सोहळे चांगलेच गाजले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nita ambani reaction after underprivileged couples mass wedding function pps