भारताचे मोठे उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी १२ जुलैला बोहल्यावर चढणार आहे. राधिका मर्चंट हिच्याबरोबर सात फेरे घेऊन अनंत अंबानी आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवणार आहे. हिंदू पद्धतीने अनंत-राधिकाच लग्न होणार आहे. तीन दिवस हा लग्नसोहळा असणार आहे. १३ जुलैला शुभ आशीर्वादचा कार्यक्रम होणार असून १४ जुलैला मोठा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या लग्नसोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रिटींसह दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनंत अंबानी स्वतः बॉलीवूडच्या सेलिब्रिटींना आमंत्रण देताना पाहायला मिळत आहेत. याशिवाय नीता अंबानी देखील मुलाची लग्न पत्रिका घेऊन काशी विश्वानाथ मंदिरात पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी वाराणसीत गंगा आरती केली. एवढेच नव्हे तर नीता अंबानींनी तिथल्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये लोकप्रिय पदार्थांचा आस्वाद घेतला. तसेच त्यांनी लाडक्या मुलाच्या लग्नासाठी साड्या देखील खरेदी केल्या. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अंबानी अपडेट’ या इन्स्टाग्राम पेजवर नीता अंबानींचा साड्या खरेदी करतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत नीता अंबानी वेगवेगळ्या साड्या पाहताना दिसत आहेत. ‘आज तक’च्या वृत्तानुसार, नीता अंबानींनी एक नव्हे तर ६० साड्या खरेदी केल्या आहेत. वाराणसी दौऱ्यावर असताना त्यांनी उशीरा रात्री एका हॉटेलमध्ये साड्यांचा स्टॉल लावला. त्यानंतर त्यांनी अनेक रंगाचा साड्या पाहिल्या. यावेळी त्यांनी स्वतःसाठी १ लाख ८० हजार रुपयांची लाख बूटी असलेली साडी खरेदी केली.

हेही वाचा – Video: “ओ स्त्री रक्षा करना”, राजकुमार राव-श्रद्धा कपूरच्या बहुप्रतीक्षित ‘स्त्री २’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, पाहा

साडी व्यापारी अमरेश कुशवाहा ‘आज तक’शी संवाद साधताना म्हणाले, “मला नीता अंबानींच्या लोकांनी संपर्क केला होता. ज्यानंतर मी ६० साड्या घेऊन हॉटेलमध्ये पोहोचलो होतो. रात्री उशीरा नीता अंबानींनी स्वतः साड्या पाहिल्या. त्यांना लाख बूटी असलेली साडी खूप आवडली. ही साडी सोन्या-चांदीने बनवली असून लाल रंगाची आहे. तसेच मी ज्या साड्या घेऊन गेलो होतो त्या सुद्धा सर्व साड्या त्यांच्याकडेच आहेत. त्यांनी स्वतःसाठी घेतलेल्या साडीला तयार करण्यासाठी ५० ते ६० दिवस लागले होते. त्याची किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे.”

हेही वाचा – Video: ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘ही’ चूक कधी तुम्हाला लक्षात आली का? व्हिडिओ होतोय व्हायरल

साडी तयार करणारे कारागीर छोटे लाल पाल म्हणाले, “नीता अंबानींनी स्वतःसाठी खरेदी केलेली साडी मी तयार केली आहे. या साडीचे वैशिष्ट्य असे की रेशमी कपड्यावर काम केले आहे. त्यावर चांदीची तार असून सोन्याचे पाणी चढवले आहे. ही साडी तयार करण्यासाठी ६० ते ६२ दिवस लागले होते. माझ्या हाताने तयार केलेली साडी नीता अंबानींना आवडली, याचा मला खूप आनंद आहे. जेव्हा त्या मी तयार केलेली साडी नेसतील तेव्हा मी सगळ्यांना आनंदाने सांगेन की, ही साडी मी तयार केली आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nita ambani was shopping for saree in varanasi for anant ambani radhika merchant wedding pps